श्रीरामपूर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची प्राथमिक कौशल्य विकसित करून स्वतःचे करिअर करावे असे उद्गार अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव भास्करराव खंडागळे यांनी व्यक्त केले,ते पुढे असेही म्हणाले की विद्यार्थ्यांनी सांगितले आहे ते प्रकाशित करावे उत्तम प्रकारचे वाचन करावे विविध प्रकारची कौशल्य अवगत करून ज्ञानाच्या दिशा पादाक्रांत कराव्यात आणि यशाचे शिखर गाठावे.
श्रीरामपूर तालुक्याच्या बेलापूर महाविद्यालयातील वाड्.मय मंडळ, सांस्कृतिक मंडळ, वाणिज्य मंडळ व विद्यार्थी वेलकम प्रोग्रॅमचे उद्घाटन करताना ते बोलत होते. सुत्रसंचालन प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी पायल म्हस्के हिने केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऍड.शरद सोमाणी यांनी सांगितले की, महाविद्यालयातील सर्व समित्या कार्यरत असून विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धांमधे भाग घेऊन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे सांगितले.प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांनी पाहुण्यांचा परीचय करुन देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.या कार्यक्रमात बिल्वदल" भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.जेटीएस शिक्षण संकुलाचे प्रमुख बापूसाहेब पुजारी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रा.प्रकाश देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे कवी संमेलन रंगले.पायल म्हस्के, अक्षदा हिंगे, गीता मेहेत्रे ,कोमल कांदळकर ,वर्षा बर्डे, समाधान पुरी, सिद्धाली नवले पूजा सोनवणे, ईशा चितळे ,मयुरी नाणेकर यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.निजाम शेख, डॉ.विठ्ठल लंगोटे, डॉ.विठ्ठल सदाफुले प्रा. सुनिल विधाटे,प्रा. डॉ.भाऊसाहेब पवार,प्रा.प्रकाश देशपांडे, डॉ. अशोक माने तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.