श्रीरामपूर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी स्वतः आयुष्याचे व्यवस्थापन करून आपले स्वतःचे करिअर तत्त्वज्ञानाने समृद्ध करावे. तत्त्वज्ञानी जीवनक्रम ही आयुष्याची गुरुकिल्ली आहे. त्याशिवाय कुणालाही मार्गक्रमण करता येत नाही असे विचार प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या की, जीवन जगत असताना प्रत्येकाची स्वतःची अशी विचारधारा असते त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आपला आयुष्य जगत असतो. तत्त्वज्ञान हा जीवनाचा गाभा असल्याने प्रत्येकाने त्याचे अनुकरण केले तरच स्व - विकास होऊ शकेल, शिक्षक दिनी उच्च आचार,विचार हे आयुष्याचे मूळ बलस्थान प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा मुसमाडे हिने केले. अध्यक्षीय सूचना वैष्णवी पवार हिने मांडली तर त्यास सुरैया शेख हिने अनुमोदन दिले. यावेळी पायल म्हस्के, पूजा सोनवणे, गीता मेहेत्रे या विद्यार्थी शिक्षकांनी तसेच प्रा. प्रकाश देशपांडे प्रा.डॉ. विठ्ठल सदाफुले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी फुंदे हिने केले तर उपस्थितांचे आभार प्रफुल्ल खपके याने मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवा वृंद,विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप विद्यापीठ गीताने करण्यात आला.