संजय महाजन
श्रीमंत अंबरनाथ मंदिर लोणी काळभोर येथील परिसरात दि. १ सप्टेंबर २०२२ रोजी लोणी काळभोर ग्रा.विद्यमान सदस्य श्री. गणेश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण प्रसंगी चिंच, कडुलिंब, आवळा, कंरज,कांचन अशा ८ फुटी देशी वृक्ष लावुण वाढदिवस साजरा करण्यात आला.
काळभोर म्हणाले पर्यावरणाचा ऱ्हास होत असून सध्या पर्जन्यमानावरही परिणाम झाला आहे. पाऊस टप्प्याटप्प्याने होत आहे. याचा विपरीत परिणाम पर्यावरण आणि शेतीवर होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करावे, असे आवाहन लोणी काळभोर ग्रामपंचायत मा. उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य श्री. योगेशनाना काळभोर यांनी केले.
या वेळी लोणी काळभोर ग्रा.सरपंच सौ.माधुरीताई काळभोर ग्रा.उपसरपंच सौ.भारतीताई काळभोर, पुणे जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ.किरणताई काळभोर, माजी. उपसरपंच विद्यमान सदस्य श्री. योगेश नाना काळभोर , ग्रा. विद्यमान सदस्य श्री.गणेश कांबळे, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन हवेली तालुका संपर्क प्रमुख बाबासाहेब यादव, युवा उद्योजक श्री.आप्पासाहेब काळभोर, युवा उद्योजक श्री.शिवाजी दादा काळभोर, सिद्धार्थ खंडागळे, जयनाथ काळभोर तसेच लोणी काळभोर ग्रामपंचायत सरपंच/ सदस्य, सर्व कर्मचारीवर्ग, ग्रीन फाऊंडेशन, लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते.