सहसंपादक/ मालेगाव
अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील वारंगी येथे भारतीय बौद्ध महासभा मालेगाव शाखेच्या वतीने दिनांक 31 ऑगस्ट 22 रोजी ग्राम शाखा वारंगी येथे ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक आदरणीय बळीरामजी पट्टेबहादूर साहेब यांना धम्म भेट म्हणून सायकल भेट देण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा प्रचार व प्रसार गावागावापर्यंत पोहोचवण्या साठी पयदल चालत चालत 5 k m ,10 km प्रवास करून आदरणीय बळीरामजी पट्टेबहादूर साहेब मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावाला भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत बालसंस्कार शिबिर महिला संस्कार शिबिर व श्रामनेर शिबीर याकरिता लोकांपर्यंत जाऊन जनजागृती करत राहतात. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सुकांडा गावातील मुळचे रहिवासी, गरीब कुटुंबामध्ये जन्म घेऊन संपूर्ण आयुष्य आंबेडकर चळवळीसाठी अर्पण करणारे अतिशय भोळा स्वभाव कुडामातीचे घर भूमिहीन शेतमजूर कुठलेही आर्थिक बाजू मजबूत नसताना स्वत: कष्टाने मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आज त्यांचे वय 65 वर्षे पूर्ण झाले आहे. या वयामध्ये सुद्धा त्यांनी मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावाला भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत धम्म भेट देऊन लोकांना मातृसंस्थेचे महत्त्व पटवून दिले आज त्यांच्या कारकीर्दीमध्ये मालेगाव तालुक्यामध्ये जास्तीत जास्त बालसंस्कार शिबिर व महिला संस्कार शिबिर त्यांनी घडवून आणले वाढते वयाप्रमाणे त्यांना रात्रीचे दिसत नाही. तरीसुद्धा चळवळ गतिमान करण्यासाठी युवकाप्रमाणे कार्य करत राहतात. आज बौद्ध समाजाला त्यांचा अभिमान आहे. या वेळी आदरणीय विलासजी गुडदे, राहुल वानखेडे, श्रीराम गुडडे, मालेगाव तालुका अध्यक्ष अनिल तायडे, व गावातील बहुसंख्य धम्म बांधव उपस्थित राहून आदरणीय बळीरामजी पट्टेबहादूर साहेब यांना सायकल भेट देण्यात आली व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.