मैत्रीदिनाचे औचित्य साधून ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने - वृक्षारोपण - JDM

JDM


Breaking

Tuesday, August 9, 2022

मैत्रीदिनाचे औचित्य साधून ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने - वृक्षारोपण

शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन 

लोणी काळभोर- मैत्री दिवसाचे औचित्य साधून वृक्षाशी मैत्री करत व एक झाड माझ्या गावासाठी, एक झाड प्रियजनांसाठी, एक झाड माझ्या मित्रासाठी, एक झाड आपल्या भविष्यासाठी असा संदेश ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने देण्यात आला. तसेच १२ फुटी वड या वृक्षांचे ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
         मैत्री ही जगातील सर्वात सुंदर, मौल्यवान आणि निःस्वार्थ बंधनांपैकी एक आहे, मग ते आनंदाचे असोत किंवा दुःखाचे. हे अगदी बरोबर म्हटले जाते की मित्र हे आपले विस्तारित कुटुंब आहे कारण आपण त्यांची निवड करतो. जेव्हा कधी आपल्याला कमीपणा वाटतो आणि रडण्यासाठी खांद्याची गरज असते तेव्हा आपल्या मनात येणारा पहिला माणूस खरा मित्र. मैत्री दिन का साजरा केला जातो माणूस कितीही यशस्वी झाला तरी प्रत्येकाला मित्राची गरज असते. फ्रेंडशिप डे हा आपल्या मित्रांचा सन्मान, आदर आणि प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी साजरा केला जातो जेणेकरून त्यांना विशेष वाटावे आणि आपल्या जीवनात त्यांची उपस्थिती स्वीकारावी. हा दिवस ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतिने वृक्षारोपण करूण फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला . या वेळी ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय शेंडगे, तसेच अभिषेक शेंडगे, जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, मेघराज शेंडगे, नानासाहेब देशमुख, सिद्धार्थ खंडागळे, बाबासाहेब घोडके,किरण बाचकर, किरण भोसले, राहुल कुंभार, उपस्थित होते.