तिरंगा यात्रे संदर्भात श्री साईबाबा संस्थांन व शिरडीतील शैक्षणिक संस्थांना भाजयुमो शिरडी शहराचे निवेदन..! - JDM

JDM


Breaking

Tuesday, August 9, 2022

तिरंगा यात्रे संदर्भात श्री साईबाबा संस्थांन व शिरडीतील शैक्षणिक संस्थांना भाजयुमो शिरडी शहराचे निवेदन..!

शिर्डी प्रतिनिधी: 
संजय महाजन
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्ष पुर्ण आहेत,त्यामुळे देशाचे लोकप्रिय मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.स्वातंत्र्यांचे हे अमृतवर्ष देशातील नवीन पिढीस अमृततुल्य आहे,देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांचे स्मरण करून अभिवादन करण्यासाठी हर घर तिरंगा अभियान संपूर्ण देशभर राबिवले जात आहे, त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा शिरडी शहराच्या वतीने संपूर्ण शहरातील शाळा,संस्था,तरुण मंडळे यांना भेट देऊन ध्वजारोहन करण्याचे व हे करत असताना त्याचा अपमान होणार नाही याबाबत आव्हान करत आहे,
याबाबत साईबाबा संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत(भा.प्र.से) यांना या हर घर तिरंगा अभियानाचे उत्तर नगर जिल्हा संयोजक अशोक पवार यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले,
मुख्य कार्यकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देऊन,श्री साईबाबा महाविद्यालयाच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन व आणखीही उपक्रम करणार असल्याचे सांगितले                 
  नुकतेच काही दिवसांपूर्वी केंद्रिय संचार ब्युरोच्या माध्यमातुन श्री साईमंदिर परिसरात पार पडलेल्या आझादी का अमृत महोत्सव क्रांतिकारकांच्या फोटो प्रदर्शनीला साईबाबां संस्थांनने सर्वोपरी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
 तसेच दि ८ ते ११ या कालावधीत साईनिर्माण शैक्षणिक संकुल, आदर्श माध्यमिक विद्यालय, जि.प.प्राथमिक शाळा,साईनाथ माध्यमिक विद्यालय तिरंगा यात्रेचे आयोजन करणार आहेत
 यावेळी युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य किरण बोराडे, शिरडी शहराचे अध्यक्ष योगेश गोंदकर,उपाध्यक्ष-गणेश शेळके, सचिव-हितेश मोटवाणी,प्रवीण भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.