राज्यस्तरीय हँड टु हँड फायटिंग स्पोर्ट्स मध्ये बुलढाणा जिल्हा 73 पदकासह प्रथम स्थानी - JDM

JDM


Breaking

Tuesday, August 9, 2022

राज्यस्तरीय हँड टु हँड फायटिंग स्पोर्ट्स मध्ये बुलढाणा जिल्हा 73 पदकासह प्रथम स्थानी

संदिप ढोरे 
मेहकर प्रतिनिधी
द्वितीय स्थानी गडचिरोली तर तृतीय स्थानी नांदेड
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे दिनांक 7 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय हँड टु हँड फायटिंग स्पर्धेचा समारोप समारंभ पार पडला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी चिखली अर्बनचे अध्यक्ष श्री सतिशजी गुप्त तर प्रमुख उपस्थिती मध्ये भारतीय महासंघाचे अध्यक्ष प्रदीप शिंदे, बालाजी अर्बनचे अध्यक्ष मंगेश व्यवहारे, दिवटे सर, सत्यनारायण लड्डा, मनोहर खडके, महाराष्ट्र सचिव राहुल मेश्राम, ज्योतीताई वाळेकर, रेणूकदास मुळे, संघटनेचे अध्यक्ष विजय वाळेकर हे उपस्थतीत होते, राज्यस्तरीय हँड टु हँड फायटिंग स्पर्धे मध्ये बुलढाणा जिल्ह्याने 73 पदकांची कमाई केली असून यामध्ये 30 सुवर्णपदकांचा समावेश आहे, या स्पर्धे मध्ये बुलढाणा जिल्ह्याने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे, दुसरा क्रमांक गडचिरोली तर तिसरा क्रमांक नांदेड संघाने पटकावला.
दिनांक 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान चिखली येथील परमहंस मौनी महाराज संस्थान येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये जिल्हाध्यक्ष विजय वाळेकर, सचिव सुमित खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढणाच्या चमूने एकूण 73 पदके पटकावली. हँड टु हँड फायटिंग स्पोर्ट असोसिएशन बुलढाणाच्या वतीने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंनी 30 सुवर्ण, 26 रजत तसेच 17 कांस्य पदक पटकावले.
सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तोरणा महिला अर्बनच्या अध्यक्षा आमदार श्वेताताई महाले पाटील, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त, बालाजी अर्बनचे अध्यक्ष मंगेश व्यवहारे, राजर्षी शाहू अर्बनचे अध्यक्ष संदीप शेळके, अदिती अर्बनचे अध्यक्ष सुरेश देवकर, न्यू दिघेकर ज्वेलर्सचे दीपक दिघेकर, राजे संभाजी अर्बनचे अध्यक्ष शिवराज पाटील, मा नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय वाळेकर, सचिव सुमित खंडारे, उपाध्यक्ष राहुल गवई, राजेश खांदेभराड, योगेश मिसाळ, शुभम जाधव, सुशील जाधव, संकेत जाधव, धनश्री भवर, निशांत आराख, चेतन पाटील, कनिष्क बनसोडे, मनीष गवई, राज कव्हळे, महेश गीते, आकाश चुनावले यांच्यासह जिल्ह्याचे सर्व प्रतिनिधी आणि खेळाडूंनी स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्या.
जिल्ह्यातील खेळाडूंनी सर्वाधिक 73 पदके पटकविल्याबद्दल या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे