मेहकर प्रतिनिधी
मेहकर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर वाटीके समोर मेहकर तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने, वाढत्या महागाई,बेरोजगारी, अग्निपथ योजना,व जीवनावश्यक वस्तूंवरील वाढवलेल्या GST च्या विरोधात केंद्र सरकार च्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, पक्ष निरीक्षक ज्ञानेश्वरदादा पाटील, जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, मेहकर विधानसभा मतदार संघ काँग्रेसचे पक्षनेते अनंतराव वानखेडे, माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी भीमशक्ती चे प्रदेश सरचिटणीस भाई कैलास सुखधाने,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार, शहर काँग्रेस चे अध्यक्ष पंकज हजारी, सेवादलाचे प्रदेश सरचिटणीस शैलेश बावस्कर,वसंतराव देशमुख, विष्णू पाखरे,विनायक टाले, प्रदीप देशमुख, डॉ भरत आल्हाट, विनोद पऱ्हाड, संदिप ढोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मोदी 'तेरी तानाशाही नही चलेंगी, मोदी हटाव देश बचाव, अश्या अनेक घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
ह्या प्रसंगी राजेश अंभोरे,उस्मान शाह, राजाराम वाटसर,दिलीप बोरे,संजय वानखेडे,अक्षय इन्कर,आकाश घायवट,नामदेव राठोड,संजय सुळकर, संदिप ढोरे, नितीन तुपे,भानुदास अजगर,छोटू गवळी,रियाज कुरेशी,आशिष देशमुख, आरती दीक्षित, सुखदेव ढाकरके, नारायण इंगळे, आकाश अवसरमोल, व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन युनूस पटेल तर आभार प्रदर्शन संजय वानखेडे यांनी केले.