संभाजी कांबळे
जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी घनसावंगी तालुक्यातील रांजणी, मासेगाव, डहाळेगाव, घोंन्शी, घनसावंगी या गावातील विविध विकास कामांची पाहणी केली. या प्रसंगी त्यांनी झाडे टिकली तर आपण टिकू यासाठी वृक्षलागवड आणि त्याचे संवर्धन करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. मासेगाव येथे डॉ विजय राठोड यांच्या हस्ते वृक्षाचा वाढदिवस साजरा करून केली. देवराई प्रकल्प पाहणी आणि नवीन वृक्ष लागवड तसेच शालेय विद्यार्थी यांच्या सहायाने सिडबॉल तळ्यातील हनुमान टेकडी मंदिर परिसरात फेकण्यात आले.
डहाळेगाव येथे कानिफनाथ टेकडीवर गावकरी आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. घोन्शी या ठिकाणी ड्रॅगन फळलागवड शेतीची पाहणी करून इ-पिक पाहणी ॲप कसे भरायचे याबाबत शेतकरी यांच्या कडून प्रत्यक्ष माहिती भरून घेण्यात आली सोबतच औजार बँक ची पाहणी केली. घनसावंगी येथील नगर पंचायत येथे भेट देऊन नवीन वाचनालयाच्या कामाची पाहणी केली तसेच नाना नाणी पार्क येथील बगीचास भेट देऊन समाधान व्यक्त केले. घनसावंगी येथील डिजिटल ग्रंथालयास भेट देऊन स्पर्धा परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी रोजगार हमी योजने उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, तहसीलदार नरेंद्र देशमुख, नगराध्यक्ष पांडुरंग कथले, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, नायब तहसीलदार गौरव खैरनार, संबधित गावांचे सरपंच, इतर संबधित शासकीय अधिकारी कर्मचारी , जिवनवृक्ष टीम चे नारायण देवकते व त्यांची टीम तसेच शेतकरी व गावकरी, ग्रामसेवक, तलाठी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.