4 हजाराची लाच घेणारा तलाठी रंगेहात पकडला - JDM

JDM


Breaking

Friday, August 5, 2022

4 हजाराची लाच घेणारा तलाठी रंगेहात पकडला

संदिप ढोरे/ खंडाळा देवी
वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे किंवा नाही? याबाबतचा अहवाल तात्काळ पाठविण्यासाठी तलाठी प्रमोद हरिभाऊ दांदडे याने तक्रारदार यांच्याकडे पडताळणी कारवाई दरम्यान 4 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज 5 ऑगस्टला करण्यात आली.
लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील एका तक्रारदार व त्यांची तर दोन साथीदार यांनी ग्राम सुलतानपूर येथील ई क्लास मधील भाडेपट्टीवर घेतलेल्या शेतीच्या वहिवाटीच्या रस्त्यावर सुलतानपूर येथील महिलेने अतिक्रमण केल्याबाबत तक्रारदार यांनी लोणार येथील तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. यासंदर्भात तहसीलदार यांनी तक्रारदार व त्यांचे साथीदार यांच्या वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे किंवा नाही? याबाबत तलाठी,ग्रामसेवक व मंडळाधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सदरचा अहवाल आरोपी तलाठी प्रमोद हरिभाऊ दांदडे शिवाजी चौक उंद्री ता. चिखली जि. बुलडाणा याने अहवाल लवकर पाठविण्यासाठी 4 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान सुलतानपूर येथील हॉटेल भोलेनाथ भोजनालय अँड वाईन बार येथे एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पंचासक्षम 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी दांदडे याला रंगेहात अटक करण्यात आली. 
एसीबी चे पोलीस उपाधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोहेकॉ राजू क्षीरसागर, प्रवीण बैरागी, जगदीश पवार,अझरुद्दीन काझी, अर्षद शेख यांनी ही कारवाई केली.