शिर्डी येथे राष्ट्रीय आदिवासी दिन उत्साहात - JDM

JDM


Breaking

Tuesday, August 9, 2022

शिर्डी येथे राष्ट्रीय आदिवासी दिन उत्साहात

शिर्डी प्रतिनिधी 
संजय महाजन
नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर व श्री.साईभक्त आप्पाभिल्ल जागले सेवाभावी संस्था शिर्डी शहर अध्यक्ष श्री.विजयभाऊ पवार व अपअध्यक्ष श्री .राजेंद्र बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आपण समाज व देशाच काहीतरी देणं लागतो हा आदर्श समोर ठेवून जागतिक आदिवासी दिन साई सावली बाल आश्रम शिर्डी साजरा करण्यात आला व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .क्रांतीकारक व भारतमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .या कार्यक्रमास मा.नगरसेवक श्री.किरण बर्डे, तुकाराम आलोट, योगेश निरभवनणे,बापु पवार, सोमेश्वर बर्डे, अर्जुन पवार, संतोष पवार, विशाल बर्डे, बाबासाहेब रजपूत, तुषार शेजवळ,सोमनाथ रजपूत,भाऊसाहेब पवार,बाबासाहेब बर्डे, अजित बर्डे, राहुल लोखंडे,रोहित जाधव,दिपक बर्डे,कृष्णा आलोट, सतिष निकम,सुनिल बर्डे, अंबादास बर्डे, राहुल गायकवाड, दिपक,आहेर,गणेश मोरे,आदि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.