आ.विखे मंत्री झाल्याबद्दल शिर्डीत जल्लोष - JDM

JDM


Breaking

Wednesday, August 10, 2022

आ.विखे मंत्री झाल्याबद्दल शिर्डीत जल्लोष

शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन 

              शिंदे- फडणवीस सरकारच् या मंत्रीमंडळात राहाता तालुक्याचे भाग्यविधाते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून सर्वात प्रथम शपथ घेतल्यानंतर शिर्डी शहरात माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शिर्डी ग्रामस्थ व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला. 
        नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच कैलासबापू कोते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शिर्डीत मोठा जल्लोष केला. दिपक वारूळे, नितीन शेळके, विलास आबा कोते, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, देवराम सजन, गोंदकर, दादाभाऊ गोंदकर, दत्तात्रय कोते, आरविंद कोते, भाऊ भोसले, बापू ठाकरे, गणीभाई पठाण, सलीम शेख, शंकर त्रिभुवन, गफ्फारभाई पठाण, राहुल रावते यांच्यासह नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. 
          आमदार विखे पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार, ही अपेक्षा ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्याला होती. कालच आमदार विखे पाटील यांना पक्षाच्या नेत्यांकडून मुंबईत येण्याचा निरोप मिळाला होता. त्यानुसार शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन आ. विखे पाटील मुंबईकडे रवाना झाले होते.
          काल सकाळी ११ वाजताचा शपथविधीचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर आ. विखे पाटील यांना कोणते मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थक कार्यकत्र्यांसह जिल्ह्याला होती. शपथविधी सोहळा सुरु झाल्यानंतर प्रथम क्रमांकांवरच आ. विखे पाटील यांना शपथ घेण्याची संधी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष द्विगुणीत झाला. शिर्डी शहरातील सर्व जेष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला.