संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी - JDM

JDM


Breaking

Tuesday, August 23, 2022

संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

त-हाडी प्रतिनिधी 
ज्ञानेश्वर सैंदाणे 
त-हाडी दि २३. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी त-हाडी येथे साजरी करण्यात आली.
त-हाडी गावाचे सरपंच मा.श्री. सुनील धनगर यांच्या हस्ते श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेलाचे पूजन व पुष्पहार नारळ फोडण्यात आले. तसेच वीर योद्धा जीवा महाले यांचे प्रतिमेस चे पूजन ओंकार पाटील यांनी केले . एडवोकेट श्री दिलीप अहिरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही हार व पूजन करण्यात आले. 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ही त-हाडी गावाचे गटनेते व तंटामुक्त अध्यक्ष तुळशीराम भामरे यांच्या हस्ते हार टाकून पूजन करण्यात आले. विर एकलव्य यांच्या प्रतिमेची पूजा मुकेश सर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमात उपस्थित रावसाहेब कदम, रावसाहेब पाटील, ज्येष्ठ पत्रकार मा. श्री रावसाहेब चव्हाण सर. किरण अहिरे, विशाल करंके, सुनील भामरे ,बापू खोंडे, देविदास खोंडे, वामन सैंदाणे. हिलाल भामरे, योगेश पारधी रावसाहेब पारधी तऱ्हाडी ग्रामस्थ व कार्यक्रमाचे आयोजक पंकज खोंडे धनराज खोंडे ज्ञानेश्वर सैंदाणे सागर खोंडे मनीष सैंदाणे, चेतन सैंदाणे जितेंद्र खोंडे अक्षय खोंडे, हिलाल खोंडे ,भगवान खोंडे, बारकू खोंडे, महेंद्र खोंडे , यांचे सहकार्य लाभले, सूत्रसंचालन माननीय श्री रावसाहेब चव्हाण सर यांनी केले, व कार्यक्रमाचे आभार पंकज खोंडे यांनी मानले.