संग्रामपूर तालुक्यात गत आठवड्यात पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली असता नदी नाल्यांना पूर गेला असल्याने नदीपत्रात मोठया प्रमाणात गौण खनिज उपलब्ध झाला आहे.
राजस्व विभागाच्या गाव पातळीवर तलाठी व मंडळ अधिकारी हे प्रतिनिधी असतात आद्य कर्तव्य असलेल्या प्रत्येक गाव पातळीवर राजस्व कर्मचारी तलाठी व मंडळ अधिकारी याची नजर असणे जरुरी असते.
मात्र पुर गेल्यापासून काहीच अल्पशा काळामध्येच नदीपत्रांमध्ये तालुक्यात बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
वान नदीपत्रातील तयार झालेल्या गौण खनिज साठयावर वाळू तस्करांनी नजर असल्यामुळे वरवट बकाल येथील सातलोन नदी मध्ये चक्क अवैध रित्या रात्रीच्या वेळेस जेसीबी मशीन द्वारे गौण खनिज उतख्तन्नन झाल्याची घटना महसूल दिनी सोमवार रोजी रात्रीच्या वेळेत घडली आहे. रात्रीच्या वेळेस अवैध रित्या उतख्तन्नन करून हजारो ब्रास गौण खनिज चोरी करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत वाळू उपसा केल्याची घटना वरवट येथील सातलोन नदी पात्रात झाली असून खुप प्रमाणात खड्डे केले आहे.
या बाबत संग्रामपूर तालुका महसुल प्रशासन मूग गिळून गप्प का? असा सवाल होत आहे.
तसेच येथील तलाठी हे मुख्यालय राहत नसल्यांने त्यांचा देखील संपर्क झाला नाही त्या करिता अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांची चौकशी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचविले असता त्यांच्याकडून या प्रकाराची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.