३१ जुलै रोजी रविवारला मुंबई येथे ठाणे जिल्हा कोळी समाज हॉलमध्ये कराटे स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये जळगांव (जामोद) च्या कराटेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वय आणि वजनगटात घवघवीत यश संपादन केले.मुंबईच्या कराटे स्पर्धेमधील फायटिंग कुमिते मध्ये कु.नेहा गोपाल निमकर्डे ने गोल्ड मेडल, प्रविण महादेव खोटाळे गोल्ड मेडल, ओम तुळशिराम पाचपोर,राजरत्न निलेश मगर यांनी सिल्व्हर मेडल पटकावले. तसेच काता कुमिते मध्ये चैतन्य गणेश चौधरी याने सिल्व्हर मेडल, कु. संजीवजी निलेश देशमुख, राघव गोपाल पवार, विवेक किरण गोलाईत, राम केशव उमाळे, मिर्झा मुसेब बेग आणि रहस्य उमेश दातीर यांनी ब्राँझ मेडल्स प्राप्त केले. सदरहु सर्व पदकप्राप्त विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय कराटे असोसिएशनच्या संचालिका मिस लताताई राजेंद्रकुमार आटक आणि मुख्य कराटे प्रशिक्षक सेन्साई राजेंद्रकुमार आटक सरांना देतात. सर्व विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
╭═══════╮
मुख्यसंपादक
📲 9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS