शिर्डी प्रतिनिधी
श्रीरामपूर मध्ये बैठक जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूक वंचित बहुजन आघाडी सर्व ताकदीनिशी स्वबळावर लढणार असल्याची माहिती पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी रविवारी दिली. श्रीरामपूर येथीलशासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा निरीक्षक प्रा, डॉ सुरेश शेळके साहेब ,राज्य उपाध्यक्षा मा दिशाताई शेख ,जिल्हा महासचिव अनिल भाऊ जाधव, जिल्हा सचिव सुनील ब्राह्मणे साहेब, जिल्हा प्रवक्ते मा डॉ जालिंदर घिगे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष डॉ,विजय मकासरे,जिल्हा सल्लागार मा मधुकर अप्पा साळवे,जिल्हा सल्लागार मा शरद भाऊ खरात, जिल्हा संघटक मा अनिल बनसोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वर्षाताई बाचकर,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष मा चरण दादा त्रिभुवन, राहुरी तालुका अध्यक्ष मा संतोष चोळके पाटील,राहता तालुका अध्यक्ष दीपक कसबे,कोपरगाव तालुका अध्यक्ष मा सचिन दाभाडे,संगमनेर तालुका अध्यक्ष संदीप मोकळं,नेवासा तालुका अध्यक्ष उदय कर्डक अकोला तालुका अध्यक्ष रवींद्र पवार,राहुरी शहर अध्यक्ष पिंटू नाना साळवे ,श्रीरामपूर शहर अध्यक्ष शुभम लोळगे,संगमनेर शहर अध्यक्ष अझीझ भाई ओहरा,श्रीरामपूर युवा तालुका अध्यक्ष सुमेध पडवळ, शिर्डी शहर अध्यक्ष किरण बोराडे, राहता शहर अध्यक्ष किरण दुशिंग ,सामाजिक कार्यकर्ते विजू भाऊ दिवे,कोकाटे साहेब अमोल सोनवणे ,श्रीरामपूर महासचिव ठोकळ,खंदारे सर,पवन शेजवळ,जेष्ठ कार्यकर्ते एकनाथ शिरसाठ,या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थिती होती. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थानच्या सर्व निवडणूका वंचित बहुजन आघाडी पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असून त्यासाठी सर्व कार्यकर्त्यानी संघटीत होवून तळागाळातील लोकांना सोबत घेवून पक्षाच्या ध्येय धोरणांचा गावागावात प्रचार व प्रसार करावा. नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावेत, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी संतोष त्रिभुवन, टिळकनगर अध्यक्ष संतोष निळे, महासचिव सुनील वाघमारेआदी उपस्थित होते तर आभार श्रीरामपूर तालुका अध्यक्ष मा चरण दादा त्रिभुवन यांनी मांडले.