राखी कधी बांधावी - JDM

JDM


Breaking

Wednesday, August 10, 2022

राखी कधी बांधावी

यंदा श्रावण महिन्याची पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या तिथी याबाबत बराच गोंधळ निर्माण झाला आहे. 

जाणून घ्या आमचे ज्योतिषी आचार्य श्री भागवत जी महाराज कोणत्या तारखेला राखी बांधण्याचा सल्ला देत आहेत.
रक्षाबंधनाची तारीख जसजशी जवळ येत आहे आणि भावाला राखी 11 ऑगस्टला की 12 ऑगस्टला याबाबत संभ्रम निर्माण झाले आहे. 
हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी, बहिणी आणि भाऊला राखी बांधते. 
दरम्यान, विविध पंचांगांमध्ये 11 आणि 12 ऑगस्ट या दोन्ही तारखांना राखी बांधण्याचा उल्लेख वेगवेगळ्या युक्तिवादांसह करण्यात आला आहे. 
त्यामुळे राखी 11 ला बांधावी की 12 ला याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
हिंदू धर्मानुसार भाद्र काळात कोणत्याही शुभ कार्याचे नियोजन केले जात नाही, तसेच 11 तारखेला भाद्र पूर्ण होत असल्याने 12 ऑगस्टला राखी बांधण्याच्या सूचना अनेक पंचांगामधून देण्यात येत आहेत. 
परंतु ज्योतिषाचार्य आचार्य श्री भागवत जी म्हणतात की, 11 ऑगस्टला श्रावण शुक्ल पक्षाची पौर्णिमा आहे, आणि 12 तारखेला सकाळी सातपर्यंतच पौर्णिमा आहे, त्यामुळे रक्षाबंधन हा सण 11 ऑगस्टलाच साजरा करावा.