शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
शिर्डीत ९ ऑगस्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधत देशवासियासमवेत साईभक्तांनी शिर्डीत झालेल्या तिरंगा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. अगदी जल्लोषात या रॅलीने शिर्डी नगरपरिषदेच्या मुख्य इमारती पासून प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 'हर घर तिरंगा' ची घोषणा केली आहे. तसेच भारताच्या इतिहासात ९ ऑगस्ट हा क्रांतीदिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने शिर्डी नगरपरिषद, ग्रीन एन क्लीन शिर्डी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, केंद्रीय राखीव पोलीस दल, सिल्व्हर ओक एज्युकेशन अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने १११ फूट लांबीच्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. शिर्डीतील साई मंदिराला परिक्रमा करत साई मंदिराचे प्रवेशद्वार क्रमांक १, साईश कॉर्नर, पालखी रस्ता, यानंतर साईबाबांच्या ४ नंबर प्रवेश गेट समोर या तिरंगा रैली आली. दरम्यान 'भारत आम्हारी जान है, तिरंगा आम्हीरी शान है' अशा घोषणांनी संपूर्ण शिर्डी दुमदुमली होती. यानंतर माजी सैनिकांचा सन्मान करत रैलीचा समारोप करण्यात आला. १११ फुटी तिरंगाचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. भारत मातेची वेशभूषा सई हराळे हिने केली होती, त्याच प्रमाणे तिरंगा रथ बनविण्यात आला होता. या रॅलीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३० जवान सहभागी झाले होते. ग्रीन एन क्लिनचे सदस्य, तर शिर्डी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, सिल्व्हर ओक अकॅडमीचे शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.