कॉग्रेसच्या वतीने रिसोड व मालेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा - JDM

JDM


Breaking

Saturday, August 6, 2022

कॉग्रेसच्या वतीने रिसोड व मालेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

वाढती महागाई बेरोजगारी व सततच्या पावसामुळे होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान आदी मागण्यासाठी रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार अमित झनक यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आमदार यांचे जनसंपर्क कार्यालय येथून सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर पोहोचला या ठिकाणी तहसीलदार अजित शेलार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशामध्ये सतत वाढत चाललेली महागाई व प्रत्येक वस्तूवर आकारण्यात येणारे जीएसटी , यामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान फार विस्कळीत झाले आहे . सर्वसामान्य कुटुंबाची अर्थव्यवस्था पूर्णत कोळमडली आहे तसेच देशांमध्ये अग्निपथ सारख्या सैन्यभरती प्रक्रिया राबवून देशातील तरुणांची फसवणूक केल्या जात आहे . ही फसवणूक सुद्धा थांबवण्यात यावी , त्यासोबतच सध्या स्थित सततच्या पावसामुळे व अतिवृष्टी यामुळे होणारे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान यामध्ये नदिकाठील शेतकऱ्यांच्या शेतीचे व सरसगट शेतीचे पंचनामे व करावे व ओला दुष्काळ जाहीर करावा व त्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी . एकीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया संकल्पना राबवत आहे त्याच देशात दुसरीकडे कुपोषण व खालावत चाललेली देशाची अर्थव्यवस्था , आजही प्राथमिक गरजा भागवण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील माणूस संघर्ष करत आहे या बाबीचा केंद्र सरकारने विचार करावा व देशातील तरुणांना , शेतकऱ्यांना व सर्वसामान्य कुटुंबातील जनतेला न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य वैभव सरनाईक, अर्जुन पाटील खरात सचिन इप्पर, बबन गारडे,जैनुद्दीन काजी, प.स.सदस्य राहुल बोडखे,अकबर बागवान, गजानन निखाते, प.स.सदस्य गणेश हरिमकर,पंजाबराव अवचार,फैय्याज अहेमद, रियाज अली, प्रकाश वायभासे,बबनराव सानप,बबाराव ढोणे,नावली सरपंच गजानन बाजड,पुजा वानेखेडे,कुसुम पवार,गंगाराम सुरसे,गजानन उगले जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव पंजाब खडसे रामदास बोडके पंजाब खनदारे सुरेश वाघ राजू खांबलकर संतोष खराडे संदीप गोळे रमेश चोपडे गणेश हरिमकर शिवाजीराव काकडे दिनकरराव बोरकर, राजू खरात रामचंद्र खरात गजानन खरात, गजानन उगले, बाळासाहेब देशमुख.
आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.