अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील मुंगळा मंडळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात साठी वाशिम येथे दि. 29 ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय समोर मुंगळा मंडळातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उप तालुका प्रमुख भगवान बोरकर यांनी केले आहे.
या वेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सभेमध्ये येऊन मुंगळा मंडळ ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी व सरसकट पंचनामे करण्यासाठी तसेच सरसकट शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर शांततेत भव्य मोर्चा काढायचा आहे.
या साठी भगवान बोरकर यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले आहे. कि दि. 29 ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मुंगळा मंडळातील सर्व शेतकऱ्यांना वाशिम येथे उपस्थित राहावे.