अण्णाभाऊंना भारतरत्न 'किताब देण्यासाठी राज्यशासनाने त्वरित एकमुखी निर्णय घ्यावा - JDM

JDM


Breaking

Saturday, August 27, 2022

अण्णाभाऊंना भारतरत्न 'किताब देण्यासाठी राज्यशासनाने त्वरित एकमुखी निर्णय घ्यावा

अण्णांभाऊचे रशियात जागतिक कीर्तीचे स्मारक उभारणार त्यासाठी शासन रशियाचा अभिनंदनाचा ठराव करते.
तर भारतरत्न देण्यासाठी शासन कधी ठराव करणार: लहुजी सेनेची मागणी

शिर्डी प्रतिनिधी:
संजय महाजन
मास्कवादी आंबेडकर वादी विचाराचे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान आहे सण 1961 मध्ये अण्णाभाऊंनी रशियाचा 40 दिवसाचा प्रवास केला त्याच प्रवासावर रशियाचा प्रवास म्हणून पुस्तक लिहिले रशियाची राजधानी मास्को या नगरीत अण्णांभाऊ चा अर्धकृती भव्य स्मारक येत्या पुढील महिन्यात लोकपर्ण होणार आहे रशियात केलेल्या अण्णाभाऊंच्या कार्याची नोंद रशिया घेते आणि त्या बद्दलचा अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहात सर्वानुमते बाके वाजवून मंजूर केला जातो हे काम चांगलेच आहे मात्र सण 2020 हे वर्ष अण्णाभाऊ साठेच जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असताना त्यांना शासनाच्या वतीने भारतरत्न हा किताब देण्यासाठी विधानसभा व विधानपरिषद कधी एकमुखी ठराव करणार असा सवाल लहुजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीचे प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनातून केला आहे. 
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या लेखणीतून अण्णाभाऊंनी समाज परिवर्तनाचे धडे दिले तेच अण्णाभाऊ जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत उपेक्षित राहिले त्याच अण्णाभाऊंना आपले सरकार कधी न्याय देणार असेही या निवेदनात म्हंटले असून महाराष्ट्रा तील परभणी बीड जालना जळगाव अमरावती या भागात अनेक बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला शिंदे फडवणीस सरकारने त्वरित लगाम घालावा अशी मागणीही या निवेदनातुन शासनाकडे केली आहे या निवेदनावर ती लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल महाराष्ट्र सचिव रामभाऊ पिंगळे युवा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब आव्हाड मजाबापू साळवे संतोष भडकवाड परशुराम साळवे समीर वीर हनिफ पठाण दगडू साळवे नंदू आरणे आदी पदाधिकाऱ्यांची नावे आहेत सदर मागणीचे निवेदन माननीय मुख्यमंत्री माननीय महसूलमंत्री यांनाही पाठविण्यात आले आहे.