स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे साईबाबा संस्थानला कॅश काउंटिंग मशीन देणगी म्हणून देणार - चेअरमन दिनेश खारा - JDM

JDM


Breaking

Sunday, August 28, 2022

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे साईबाबा संस्थानला कॅश काउंटिंग मशीन देणगी म्हणून देणार - चेअरमन दिनेश खारा

शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे तर्फे साईबाबा संस्थांनला कश कॉन्टिनिग मशिन देणगी म्हणून देणार शिर्डी-स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन मा श्री दिनेश खारा साहेब आज शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शनासाठी आले होते त्यांनी श्री साईबाबा संस्थानला पैसे मोजण्यासाठी कश कॉन्टिनिग मशिन देणगी म्हणून देणार असल्याची माहिती शिर्डी शाखेचे व्यवस्थापक श्री निलेश नगराळे यांनी दिली.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त श्री सचिन गुजर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी शिर्डीचे मा नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, बँकेचे महाराष्ट्र सर्कलचे सी जी एम अजयकुमार सिंग साहेब, अहमदनगर जिल्ह्याचे आर एम श्री निंबराज मोहोळकर,शिर्डी शाखेचे व्यवस्थापक निलेश नगराळे साहेब व स्टेट बँक स्टाफ युनियन अहमदनगरचे रिजनल सेक्रेटरी रमेश गोडगे सह व्यवस्थापक श्रीराज शेवाळे आदींसह बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.