अहमदनगर (रमेश जेठे )
मेहकर जि.बुलढाणा येथील धडाडीचे अभ्यासू पत्रकार आणि "दैनिक मेहकर टाईम्स"चे वृत्त संपादक श्री.उद्धव श्रीराम फंगाळ यांची "स्वाभिमानी संपादक सेवा संघ" या वार्ताहर - संपादकांच्या राज्यव्यापी संस्थेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली गेली असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांनी सांगितले.
स्वाभिमानी संपादक सेवा संघ ही राज्यव्यापी संस्था नवोदित वार्ताहर,संपादक यासोबतच मुद्रण क्षेत्रातील सर्वच श्रमीकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने प्रयत्नशील असते.
प्रत्यक्ष, अप्रत्येक्ष नवोदित संपादक, वार्ताहर यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचारास वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणे,तसेच नवोदित वार्ताहर, संपादक यांच्यासाठी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करुन शासन दरबारी त्यांना येणाऱ्या विविध आडचणी सोडविणेकामी सातत्याने पुढाकार घेते.
तसेच विविध लघू प्रसार माध्यमे आणि मुद्रण क्षेत्रातील गरजू श्रमिकांसाठी विविध समाजाभिमूख उपक्रम राबवून त्यांच्या आडीआडचणी समजून घेत त्यांना आधार देण्याचे उपक्रम सातत्याने राबवत असते.
श्री.फंगाळ यांची विविध प्रसार माध्यमांमधील अनुभव आणि कामे पाहता, तथा सर्वसमावेशक आणि सर्वांना उचित न्याय देण्याची भुमिका पाहता त्यांची या पदावर नियुक्ती केली असल्याचेही श्री.शेख यांनी सांगितले.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक उपाध्यक्ष माणिकराव जाधव, सचिव ऍड, मोहसिन शौकत शेख, खजिनदार अय्युबभाई पठाण, कार्याध्यक्ष अनिल म्हात्रे, पुणे जिल्हाध्यक्ष तथा सा.भवानीमाताचे संपादक लक्ष्मण भिसे,सदस्य अफजल मेमन या सोबतच महाराष्ट्र संपादक परिषदेचे प्रकाशराव कुलथे, सिटिझन्स जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष नागेशभाई सावंत, प्रदेश महासचिव राजेंद्र नारायणे, महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघाचे अध्यक्ष विजयराव नगरकर, महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकतअली शेख,अखिल वडार समाज संघाचे रमेश जेठे (सर), मानव सुरक्षा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल राखपसारे, प्रदेशाध्यक्ष ऍड. बशीरभाई भुरे, चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) चे शिवाजीराव साळवे, अ.नगर जिल्हा संघटक दिलीपराव शेंडे (सर), एकलव्य सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भाऊराव माळी, प्रदेशाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार,सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, माहिती अधिकार आणि पोलिस मित्र संघटनेचे कमलेश शेवाळे (देवा), दैनिक मेहकर टाईम्स चे हारुनभाई सय्यद ऍड.मोईनभाई सय्यद,गजानन गारोळे, दैनिक शौर्य स्वाभिमान च्या किरणताई वाघ,दैनिक स्नेहप्रकाश चे स्वामीराज कुलथे, दै.ताजी खबरे चे अलिम शेख, दैनिक साईदर्शनचे जितेश लोकचंदानी,सा. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चे शाह मुश्ताकअली, दैनिक सार्वमंथन चे अनिल कोळसे, दैनिक धुमाकूळ चे इम्रान पटेल, दैनिक कॉमन न्यूज चे अल्ताफ शेख, दैनिक जलभूमीचे बाळासाहेब जाधव, दैनिक तुफान क्रांती चे मिर्झागालिब मुजावर, सा.स्वतंत्र विदर्भ की ताकत चे इस्त्याकभाई शेख,सा.मखदूम चे आबीदखान दुलेखान,सा.हक्काचे विचारमंच चे रमेशराव बोरुडे, सा.राजनिष्ठा चे मनिष अग्रवाल, सा.सत्य एक्सप्रेस चे रविंद्र जगताप,एस न्यूज मराठी वृत्त वाहिनी चे जयश सावंत, शिर्डी एक्सप्रेस चे विशाल जेठे, सा.खरे सव्वाशेर चे लियाकतखान पठाण,सा.पुर्व कल्पनाचे सोमनाथ जानराव, सा.माहिती व कायदा चे असलमभाई सय्यद,अमन सय्यद,सा. क्षितिज समाचार चे गोरखदादा गवारे,सा.साईगंगा चे रमेश कापकर,सा.चौफेर कानोसा व पब्लिक ऍप चे संदिप आसने, सा.प्रशासकीय अधिकारी चे अमोल शिरसाठ,शेतकरी विचार मंच चे शेख जावेद बशीर, सा.समतादूत चे अन्सारभाई शेख,आर.के.न्यूज चे राहुल कोळगे,शहापूर गजाली चे संजय भालेराव, वेबन्यूज व अनेक वृत्तवाहीनीच्या सुप्रसिद्ध निवेदिका सौ.किरणताई जाधव/बागुल, पत्रकार जावेदभाई शेख, पत्रकार प्रमोद चौधरी डॉ.सलीम शेख, प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये (सर) प्रा.गुंफाताई कोकाटे मॅडम, अंजली वारकरी मॅडम, जयश्री सावजी मॅडम, समता फाऊंडेशनच चे सरताज शेख, जे.जे.फाऊंडेशन चे जोएफ जमादार आदींनी अभिनंदन केले आहे.