स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलिसांची ७५ कि.मी.ची दौड; दहा दिवसात केली ७५ वृक्षांची लागवड - JDM

JDM


Breaking

Friday, August 5, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलिसांची ७५ कि.मी.ची दौड; दहा दिवसात केली ७५ वृक्षांची लागवड

जळगाव जामोद/प्रतिनिधी 
जळगाव जामोद भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त जळगाव जामोद पोलीस स्टेशनकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. 
त्याचाच एक भाग म्हणून रविवारी पोलीस स्टेशन परिसरात ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली तर दररोज पहाटे सात किलोमीटर याप्रमाणे दहा दिवसांत ७५ • किलोमीटरची दौड पोलिसांकडून केली जात आहे.

'आजादी का अमृत महोत्सव' या उपक्रमांतर्गत पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी १५ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये 'हर घर तिरंगा', वृक्षारोपण, ७५ किलोमीटरची दौड, महिलांविषयी जनजागृती व सायबर क्राईमबद्दल मार्गदर्शन अशा उपक्रमांचा समावेश आहे.
गत चार दिवसांपासून रोज पहाटे सात किलोमीटर याप्रमाणे पोलिसांची बऱ्हाणपूर रोडने दौड सुरू आहे. दहा दिवसांत ७५ किलोमीटरची दौड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.. वृक्षारोपणाचा उपक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांसमवेत पोलीस स्टेशनच्या आवारात रविवारी राबविण्यात येऊन ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली.
स्वातंत्र्यदिनापूर्वी सायबर क्राईम मार्गदर्शन व महिला विषयी जनजागृती मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे. जळगाव नगरासह तालुक्यातील एकही घर विना 'आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम सर्वासाठी नवीन ऊर्जा देणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न पोलीस विभाग करीत आहे. सर्व पोलीस बांधव समर्पित भावनेने याकरीता काम करीत असल्याने उत्तम प्रतिसाद मिळत आहे.



╭═══════╮
       मुख्यसंपादक
     📲 9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS