अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील मुठा - दापुरी येथे भारतीय बौद्ध महासभा मालेगाव शाखेच्या वतीने दि. 28/ 8 /2022 रोजी सायंकाळी रात्री 10 वाजता धम्म प्रवचन मालिकेचा अंक ग्राम मुठ्ठा- दापुरी या ठिकाणी घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मालेगाव तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अनिल तायडे उपस्थित होते. सर्वप्रथम महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आपल्या जीवनामध्ये धम्माचे महत्त्व काय यावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातून बहुसंख्य धम्म बांधव उपस्थित होते लवकरच ग्राम मुठ्ठा- दापुरी याठिकाणी भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेच्या फलकाचे अनावरण सुद्धा करण्यात येणार आहे धम्मयान मासिक सभासद नोंदणी सुद्धा करण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये ग्राम शाखा अध्यक्ष करिता सर्वानुमते काशीराम दगडूजी खंडारे यांची ग्राम शाखाध्यक्ष पदी निवड आली. सोबतच ग्राम शाखा महिला अध्यक्षपदी अनुराधा बंडू खंडारे यांची सुद्धा सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी गावातून काशीराम दगडू खंडारे, गोकर्ण बाई खंडारे, दामोदर खंडारे, शोभाबाई खंडारे, बंडू खंडारे, अनुराधा खंडारे, बळीराम डोंगरदिवे, छाया बळीराम डोंगरदिवे, सुमनबाई रामेश्वर रोकडे, बबन दगडूजी खंडारे, शिलाबाई खंडारे, प्रमोद खंडारे, सोनू खंडारे, सुमित खंडारे, अमोल खंडारे, मनीषा खंडारे, मनोज खंडारे, निशा खंडारे, अविनाश खंडारे, अक्षय खंडारे, विशाल खंडारे, प्रल्हाद डोंगरदिवे, चंदाबाई डोंगरदिवे, निकिता डोंगरदिवे, नर्मदाबाई वाकोडे, चतुराबाई खिल्लारे, विशाल डोंगरदिवे, अक्षय खंडारे आदी या धम्म बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीराम खंडारे यांनी केले तर आभार बळीराम डोंगरदिवे यांनी व्यक्त केले.