अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे येथील पोलीस स्टेशन मध्ये आगामी गणेशोत्सव निमित्ताने शांतता समीतिची सभा आयोजित केली होती. आगामी काळात गणेश उत्सव, दसरा व दुर्गा उत्सव हे महत्त्वाचे धार्मिक सण येत आहेत.
तेव्हा कोरोनाच्या विश्रांतीनंतर जल्लोशात हे सण साजरे करताना कायद्याचा भंग होणार नाही, याची दक्षता घेऊन नशा मुक्त आगामी सण साजरे करण्याची काळाची गरज असल्याचे मत . आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दि. 27 रोजी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.
मालेगाव तालुक्यातील जउळका पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मधील प्रागनात शांतता समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार मोरे व उपविभागीय जिल्हा पोलिस अधिकारी यशवंत केडगे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रवी काळे मालेगाव प्रमुख म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक ठाणेदार अमोल गोरे यांनी केले.
शहरातील प्रतिष्ठित नागरिक रमेश लांडगे, रामनारायण मंत्री, दिपक आंधळे, समाधान घोडके, पोलीस पाटील पिपळा वसंत लांडकर, सरपंच बोरगाव विजय सरोदे, पोलीस पाटील जउळका प्रदीप पाटील कुटे घिव्हा या वेळी उपस्थित होते.