संजय महाजन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यपूर्ण क्षणाला साक्षीदार होत असतांना अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान , स्वातंत्रवीर वि दा सावरकर यांचे नातू प्रसिद्ध जेष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर यांनी आज शिरडी येथे सहकुटुंब साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा शिर्डी शहर, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स व श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी अॅड विक्रांत वाघचौरे, रवी कोलकर , राकेश भोकरे, कैलास आरणे, संदीप झरेकर आदी उपस्थित होते.