अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांनी पाठ पुरवठा करून जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे.
मुंगळा हे गाव तालुक्यात लोकसंख्याच्या दृष्टीने मोठी ग्रामपंचायत आहे. मुंगळा या गावाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून. व येथील नागरीकांची मागणी नुसार मुंगळा येथे जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांनी जल जिवन मिशन योजने अंतर्गत ४ कोटी ९५ लक्ष रुपये मंजुर करुन घेतले आहे. आता मुंगळा वासीयानां लवकरात लवक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
गावामध्ये बऱ्याच दिवसापासून पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याची समस्या फार गंभीर होती. मात्र, आता ही समस्या कायमची सुटणार असून गावातील नागरिकांना पिण्याकरिता आता शुद्ध पाणी मिळणार आहे. उर्ध्व मोर्णा प्रकल्पामधून ५ किलोमीटर पाईपलाईनच्या साह्याने पाणी गावामध्ये आणून फिल्टर करून सर्वसामान्य जनतेला वितरण व्यवस्थेमार्फत प्रत्येक घराघरापर्यंत पाणी या योजनेमधून पुरवठा होणार आहे. गावामध्ये १० किलोमीटर पाईपलाईनचे जाळे तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक लक्ष 81 हजार लिटर क्षमतेचे टाकीचे बांधकाम सुद्धा करण्यात येणार आहे. सुसज्ज फिल्टर प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून पासून प्रतीक्षेत असलेली पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर सुरू होणार आहे. योजनेला शासन स्तरावर मंजुरात मिळाली असून आता मुंगळा येथील ग्रामस्थांची कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली निघणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्या सौ लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांनी दिली आहे.