संस्कार क्लासेस व युवानेते अकुश लाड यांच्या तर्फे आयोजीत "वेध भविष्याचा" संपन्न - JDM

JDM


Breaking

Monday, August 15, 2022

संस्कार क्लासेस व युवानेते अकुश लाड यांच्या तर्फे आयोजीत "वेध भविष्याचा" संपन्न

मानवत प्रतिनिधी 
इरफान बागवान 
दि 15 ऑगस्ट रोजी संस्कार कोचिंग क्लासेस मानवत व डॉ. अंकुश लाड यांच्या सौजन्याने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी 'वेध भविष्याचा' हा उपक्रम राबविण्यात आला. 
या अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व NEET-IIT ची भविष्यात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर गुणांची तालुकास्तरीय परीक्षा मोफत घेण्यात आली. 
ज्यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारितोषिक व ट्रॉफी देऊन प्रोत्साहित केले.
पहिल्या गटातील उत्तीर्ण विद्यार्थी (वर्ग 5 ते 7 वी)
प्रथम - महेश नागनाथ होगे
द्वितीय - अभिराज सुरेशराव जाधव
तृतीय - शर्वरी विनोद दिवसे 
आणि उत्तेजनार्थ 15 विद्यार्थी.

दुसऱ्या गटातील उत्तीर्ण विद्यार्थी (वर्ग 8 वी ते 11वी)
प्रथम - दिपराज मुंजा रोडे 
द्वितीय - श्लोक अतुलकुमार मणियार
तृतीय - निशात ज्ञानेश्वर घुले 
आणि 15 उत्तेजनार्थ विद्यार्थी.

यावेळी मी मनोगतात सांगितले की, आपल्या मानवत शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर गुणवत्ता आहे, त्यास योग्य दिशा देण्याची गरज आहे. ते कार्य आपले गुरुजन वर्ग उत्कृष्ठरित्या पार पाडत आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पालकांनी पाठबळ द्यावे असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनो, केवळ परीक्षार्थी बनू नका, आयुष्यात काय व्हायचे हे निश्चित करा, त्याचे ध्येय घेऊन चाला व मेहनत करा. निश्चित यशस्वी व्हाल, असा सल्ला देत सर्वांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मानवत नगरीचे भूषण नुकताच भारतीय सैन्यदलातून प्रदीर्घ सेवा पूर्ण करणारे मेजर दिगंबर सुधाकरराव राऊत यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी माझे सहकारी दत्ताराव चौधरी, प्रा. सुधीर कोकरे सर, प्रा. पवार सर, प्रा. रासवे सर, प्रा. पाटील सर, प्रा. गिराम सर, प्रा. निर्मळ सर, बापू रासवे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.