मानवत प्रतिनिधी
इरफान बागवान
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिनी नगर परिषद येथे 'आरोग्य शिबिराचे' उद्घाटन झाले. मानवत ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर यांच्यावतीने नगर परिषद कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी व रोगनिदान करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार झाडगावकर, ओ. एस शेषेराव बोरेवाड, इंजी. अन्वर भाई, इंजी. आडसकर, संजय नाईक, शंकर कच्छवे, केमिस्ट खरात, कपिल भरड, मंगेश खोडवे आदी उपस्थित होते.