संजय महाजन
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे,श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय मौजे सुरेगाव कोळपेवाडी येथे माजी आमदार मा श्री अशोकदादा काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष नामदार मा श्री आशुतोष दादा काळे साहेब यांच्या प्रेरणेने रयत संकुल सुरेगाव कोळपेवाडी चा संयुक्तपणे भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री ज्ञानेश्वर हाळनोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तसेच श्री,छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंन्द्र पाचोरे सर.सर्व ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी साळवे, यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय कपडे वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये सहभाग घेतला होता यावेळी भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्ष अर्थातच अमृत महोत्सवी वर्ष या निमित्तानं आपल्या श्री छञपती संभाजी प्राथमिक विद्यालयात नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील इ.१ ली व इ.२ री च्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा व इ.३ री व इ.४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.इ.१ ली व इ.२ री च्या विद्यार्थ्यांनी भारतीय ध्वजात सुंदर रंग भरले.तसेच इ.३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा या विषयावर आधारित सुंदर चित्र रेखाटन करून त्यात आकर्षक रंग भरले. सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी मार्गदर्शन केले. याची काही क्षणचिञे झालेल्या निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धांचे तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री ज्ञानेश्वर हाळनोर यांनी सर्व विद्यार्थ्यांना तसेच श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र पाचोरे सर यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच यांनी आपल्या शुभसंदेशात तिरंग्याचे महत्त्व व क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिली.
यावेळी विद्यालयातील व स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री थोरात सर तसेच शिंदे सर यांनी केले तसेच आभार सौ दवंगे ताई श्रीमती ससाणे ताई श्री बैरागी सर श्री दवंगे सर श्री पंडुरे सर श्री वसावे सर श्री विधाते सर श्री भगुरे सर व इतर या सर्व सेवकवृंद यांनी परीश्रम घेतले.