प्रतिनिधी : सतीश गायकवाड
आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक प्रमुख महोत्सव या दिवशी महाराष्ट्रातील व देशाच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे श्रीहरी विठू माऊलीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची फार मोठी भीड पंढरपुरात उमडलेली असते.कोरोना परिस्थितीमुळे गेली दोन वर्ष भाविक-भक्तांची विठू माऊलीशी भेट घडली नाही व वारकरी, माळकरी, टाळकरी यांच्या वारीचा गजर महाराष्ट्रात दुमदुमला नाहीत तो यावर्षी दुमदुमत आहे या दिंडी सोहळ्याची प्रतिकृती मुक्ताईनगर शहरात स्वर्गीय निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भव्य दिव्य वारी काढून सर्वांना भेटी लागी जीवाची आस लावून दिली, यातच शाळेतील मुला-मुलींनी श्रीहरी विठू माऊली रुक्मिणी आणि विविध संतांची वेशभूषा धारण करून जणू अवघे पंढरपूर मुक्ताईच्या मुक्ताईनगरीत आवतरवले; विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध अभंग, पावली, टाळ, मृदुंग फुगडी खेळत ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात या भव्यदिंडी सोहळ्याचे पंढरपुरी वास्तव्य मनोरम्य दृश्य सादर करून सर्व भाविक भक्तांची व मुक्ताईनगरवासियांची मने मंत्रमुग्ध करून टाकलीत; खरंतर या आधुनिक युगात विद्यार्थी जीवनापासून विद्यार्थ्यांची आपल्या सांस्कृतिक नीती मूल्यांशी, आदर्शांशी सांस्कृतिक व पारंपारिक वारसांशी नाड ही जोडलीच पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे हे तारतम्य लक्षात घेऊन व महाराष्ट्रच्या महान संस्कृतिची, संतांच्या महान कामगिरीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी.
आजचा विद्यार्थी या आधुनिक युगात पुढे भरकटून न जाता आपल्या मातीशी व आपल्या माणसांशी पुढे जुळून रहावा हे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेच्या संचालिका माननीय खासदार रक्षाताई निखिल खडसे यांच्या अनमोल मार्गदर्शनातून व शाळेचे प्राचार्य व्ही. के. वडस्कर व सहशिक्षक स्वप्निल चौधरी सर, गणेश कोळी सर, अमोल सुतार सर, सरदार तायडे सर, गणेश बोदडे सर, तुषार पाटील सर, महेंद्र बोदडे सर, विनोद सर, सतीश गायकवाड सर, रोशन मालगे सर, शुक्लोधन बोदडे सर, महाजन सर, शिक्षिका राजश्री फेगडे मॅडम, दिपाली वाघुळदे मॅडम, सारिका मानके मॅडम, रूपाली चौधरी मॅडम, ज्योती पालवे मॅडम, गीता सोनवणे मॅडम, प्राजक्ता भंगाळे मॅडम, कल्पना तायडे मॅडम, पूजा खाचणे मॅडम, राणे मॅडम, नीलिमा कात्ररे मॅडम, प्रियंका पाटील मॅडम, पुनम खेवलकर मॅडम, ठाकूर मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी भूषण चौधरी सर, आकाश सोनार सर, सागर वंजारी सुमित, महेंद्र पाटील, पाटील काका, तसेच शेवटी ज्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत असे मुक्ताईनगर पोलीस प्रशासन या सर्वांच्या अनमोल सहकार्यातून हा भव्य दिव्य दिंडी सोहळा आनंदात पार पडला.
मुख्यसंपादक
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS