प्रतिनिधी/संजय महाजन
तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने एक लाख वृक्षारोपण प्रकल्प करण्यात येत आहे.या अनुषंगानेच श्री.नंदकिशोर मधुकर काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वड,पिंपळ, करंज,कदंब,खैर अशी विविध जंगली झाडे वाढदिवसानिमित्त लावण्यात आले.
काळभोर बोलताना म्हणाले, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही.
मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे.
वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात.
प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वच्या संधर्भात महत्वाची भूमिका बजावीत आहे. मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या सर्व गोष्टी अगदी निरपेक्ष हेतूने वृक्ष देतात.
वृक्षांपासून आपणास अन्नधान्यापासून ते घरसजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू सर्व काही मिळते. सर्व सजीवांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजें ऑक्सीजन.
ऑक्सीजन श्वास घेऊन आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो.
हाच कार्बन डायऑक्साइड वृक्ष शोषून घेतात व आपणाला आवश्यक असणारा ऑक्सिजन ते सोडतात असे प्रतिपादन नंदकिशोर काळभोर यांनी केले.
या वेळी नंदकिशोर मधुकर काळभोर, वंदना काळभोर, संजय काळभोर, स्मिता काळभोर, विनोद काळभोर, सुवर्णा काळभोर ,अमित काळभोर , शितल काळभोर , सुयोग काळभोर, अक्षय काळभोर, प्राजक्ता काळभोर तसेच ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, जीवन जाधव, मेघराज शेंडगे, नानासाहेब देशमुख उपस्थित होते.
मुख्यसंपादक
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS