अजय चोथमल
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा वाशिम यांच्या मार्फत वर्षा्वास व धम्म ग्रंथ वाचनाचे उद्घाटन आषाढ पौर्णिमेला बुधवार दि १३ जुलै रोजी दुपारी १२ : ३० वाजता आनंद बुद्ध विहार अकोला नाका वाशिम येथे करण्यात येणार आहे.
दरवर्षी भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत वर्षा्वासाचे कार्यक्रम आयोजित करण्यात असते कोविड काळात ऑनलाईन व्दारे उपक्रम राबविण्यात आला होता. सध्या कोवि कोविड प्रभाव नसल्याने प्रत्यक्ष गावोगावी जाऊन प्रवचने व्याख्याने दिली जाणार आहे. त्याकरिता प्रत्येक गावात ग्रंथ वाचनाचे नियोजन व प्रारंभ म्हणून पौर्णिमेच्या दिवशी उद्घाटन करण्यात येणार आहे.
तसे सर्व गावातील उपासक यांनी त्यादिवसापासुन ग्रंथ सुरू करावा. त्याचप्रमाने समाज बांधवांना धम्म ग्रंथाचे सामाजिक परिस्थिती चे चालू घडामोडींचे योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील अभ्यासु विचारवंतांनी प्रामुख्याने पुढे येऊन सहभागी व्हावे त्याकरिता व्याख्यान कर्ते याचे नियोजन बैठकीत करण्यात येणार आहे.
तसेच बैठकीत नविन केंद्रीय शिक्षीका मुंबई येथुन प्रशिक्षण घेऊन आल्या आहेत. त्यांचा सत्कार सुध्दा करण्यात येणार आहे.
भारतीय बौद्ध महासभेचे कार्य वाढविण्यासाठी महत्वपूर्ण काही निर्णय घेण्यात येईल.समता सैनिक दलाचे कार्य वाढविण्यासाठी सखोल मार्गदर्शन म्हणून समता सैनिक दल यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे आणि बालकांना संस्कारित करण्यासाठी वर्षावास मध्ये काय नियोजन करता येईल त्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
करिता पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. तालुका अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य , समता सैनिक दल पदाधिकारी, महिला आघाडी, माजी श्रामणेर यांनी उपस्थि राहावे अस जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत व जिल्हा पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
मुख्यसंपादक
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS