मानवत येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू - JDM

JDM


Breaking

Sunday, July 10, 2022

मानवत येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू

मानवत प्रतिनिधी
इरफान बागवान

शहरातील गजानन महाराज मंदिर जवळ बायपास रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी नऊ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली अपघाती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले तालुक्यात काळवीटासह अन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
साराच्या शोधामध्ये वन्य प्राणी सर्वत्र फिरत आहे त्यातच माणूस शहरातील गजानन महाराज मंदिर जवळ बायपास रोड व सायंकाळच्या सुमारास काळवीट जात असताना अज्ञात वाहनाने या काळवीटास जोराची धडक दिली.
अपघातानंतर वाहनचालकाने पळ काढला वस्तीतील काही लोकांना रस्त्यावर कडेला काळवीट पडल्याचे समजले त्यांनी त्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक फिरोज पठाण यांना दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्ररभाकर कापुरे ,पोलीस नाईक नरेंद्र कांबळे, पोलीस नाईक शरीफ पठाण ,यांनी घटनास्थळी धाव घेतली काळवीट मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी वन विभागाचे पथक आल्यानंतर पंचनामा केला.



मुख्यसंपादक
     📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS