कुंभार पिंपळगाव येथील अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई - JDM

JDM


Breaking

Sunday, July 10, 2022

कुंभार पिंपळगाव येथील अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी
संभाजी कांबळे
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे मागील काही दिवसांपासून हॉटेल टपरी येथे अवैध देशी विदेशी दारू विक्री होत असल्याने घनसावंगी पोलीसांच्या वतीने अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करत हॉटेल व टपऱ्यावर सहा ठिकाणी छापे मारुन अवैध देशी व विदेशी दारुची चोरटी विक्री करणारे इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडुन 9740 रुपयांचा देशी विदेशी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन चोरटी दारू विक्री करणाऱ्या सहा इसमाविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगीचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन,पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ, देवडे,कुंटे ,वैराळ,वैदय,राठोड, गायकवाड,मंडलिक यांच्याकडुन करण्यात आली.


╭═══════╮
       मुख्यसंपादक
     📲 9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS