संजय महाजन
शिर्डी येथील साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शनाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या काया काढण्यात याव्यात व श्री साई द्वारकामाई मंदिर भाविकांना बसण्यासाठी खुले करण्यात यावे. अन्यथा 23 ऑगस्ट 22 पासून द्वारकामाईसमोर आपण आमरण उपोषण करू, अशा आशयाचे पत्र पंजाब राज्यातील शिवसेना टाकसाली नॅशनलचे घेअरमन व साईभक्त सुधीर कुमार सुरी यानी श्री साईबाबा संस्थानच्या मुखा कार्यकारी अधिकारी याच्याकडे दिले आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही पंजाब राज्यातील साईभक्त असून आम्ही श्री साईबाबांच्या दर्शनाला नेहमी शिर्डीत येत असती. परंतु पूर्वीप्रमाणे द्वारकामाई मध्ये बसण्यास व धावण्यास परवानगी नाही. तेथे असणारे अधिकारी, कर्मचारी द्वारकामाई मंदिरात बसू देत नाही. बाबू देत नाही. त्यामुळे येथे बसण्यास परवानगी द्यावी, तसेच द्वारकामाई चे मंदिर उत्सव काळात तरी रात्रभर भक्तांसाठी दर्शनास बसण्यास उघडे ठेवावे असे त्यांनी या पत्राद्वारे विनंती केली असून साई संस्थानच्या प्रवेशद्वार दोन वर जे साईभक्त सकाळी काकड आरती साठी दर्शन रांगेत उभे राहतात त्यांना पाणी पाऊस, डासांमध्ये बाहेर तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. त्यांची संस्थान प्रशासनाने दखल घेऊन काकड आरतीसाठी बाहेर उभे राहणाऱ्या भाविकाना दर्शन हॉलमध्ये घेण्यात येत नाही. तेथे त्याना घेण्यात यावे येथे काकड आरतीसाठी येणाऱ्या भाविकाची बराण्याची सोय करण्यात यावी असे त्यांनी या पत्रकात म्हटले असून यावर संस्थान प्रशासनाने त्वरित विचार करून त्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही 23 ऑगस्ट 22 रोजी द्वारकामाई समोर आमरण उपोषण करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. व पुढे पत्रात त्यांनी म्हटले आहे की श्री साईबाबांचे दर्शन मनोभावे व्हावे हीच आमची इच्छा आहे.
आम्हाला कुठल्याही प्रकारे कोणाला इजा न पोहोचता बाबाची द्वारकामाई रात्रभर उघडून बाबाच्या भक्तांना दर्शन व आरतीमध्ये बसण्यास परवानगी देण्यात यावी. हीच आम्हा साई भक्तांची इच्छा आहे. साईबाबा संस्थानने ती पूर्ण करावी,
अशी मागणी पंजाब राज्यातील शिवसेना टाकसाली नॅशनल में चेअरमन व साईभक्त सुधीर कुमार सूरी यांनी या पत्रातून केली आहे.
मुख्यसंपादक
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS