ब्राह्मणवाडा येथे रोड साठी सरपंच अनिल तायडे यांना निवेदन - JDM

JDM


Breaking

Wednesday, July 6, 2022

ब्राह्मणवाडा येथे रोड साठी सरपंच अनिल तायडे यांना निवेदन

सहसंपादक
अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ग्रामस्थांनी केली रस्त्याची मागणी ब्राह्मणवाडा न. मा येथे अर्ध्या गावाचे पुनर्वसन झाले व अर्धेगाव जुने तिथेच आहे. पुनर्वसन पुर्ण गावाचे व्हावे करीता मागणी केली. परंतु काही पुनर्वसन गावाचे झाले नाही व त्यामुळे जुन्या गावातील विकास कामे खोळबली आज जवळजवळ 64 ते 65 वर्ष ग्रामपंचायत स्वराज्य संस्था स्थापन होऊन तरी सुद्धा गावातील बऱ्याच ठिकाणचे रस्ते झाले नाहीत. याच्यातच गावाला युवा सरपंच लाभल्या मुळे गावात विकास कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात नवचैतन्य निर्माण होऊन विकास कामाला जोर धरला आहे. व नागरिकांच्या मागण्या पूर्ण होत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी विकास कामे व्हावे करिता कामाची मागणी गावातील नागरिकाकडून होत आहे. आज जुन्या गावातील कधी न झालेल्या रस्त्यासाठी सरपंच अनिल तायडे यांच्याकडे गावातील नागरिकांनी निवेदनाद्वारे कधी न झालेल्या रस्त्यावरती काम करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनावरती राहुल दत्तराव ठाकरगे, कन्हैया हरिभाऊ जोरेवार, अशोक विश्वनाथ कांबळे, निलेश निरंजन घुगे, अनिल कन्हैया जोरेवार, यमुना गोविंदा घुगे, माला बाई अर्जुना साठे, मिलिंद ठाकरगे, दिगंबर नागरे, दिलीप तायडे, देवानंद तायडे, गजानन ठाकरगे, नमो कांबळे, गोपाल जुमडे, संतोष राऊत, तुळशीराम जोरेवार, समाधान साठे, मोहन घुगे आधी नागरिकांच्या सह्या आहेत.