अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे लोकसहभागातुन रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यात आले. ब्राह्मणवाडा येथे रोडवर मोठ मोठे खड्डे पडले आहे सध्या पावसाळा सुरू आहे.
त्यामुळे मुळे या रोडवर चालणे कठीण झाले आहे. या रोडवरून शाळेतील विद्यार्थीना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
म्हणुन येथील सरपंच अनिल तायडे यांनी लोकसहभागातून या रोडवरील खड्डे मध्ये मुरूम टाकून खड्डे बुडविले आहे.
या वेळी सेवा सोसायटी अध्यक्ष प्रकास सानप, अनिल तायडे सरपंच, महादेव पुजाजी लठाड, भारत गिऱ्ह, अदिनाथ सानप, ग्रामपंचायत सदस्य यानी सहभाग घेतला होता. ब्राह्मणवाडा येथे रोडवर पडलेल्या खड्ड्यात मुरूम टाकल्याने येथील ग्रामस्थांनी, व पालकांनी आभार मानले आसुन सरपंच अनिल तायडे यांचे अभिनंदन केले आहे.