संजय महाजन
ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजीत लोणी काळभोर तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर परिसर १ लाख वृक्षारोपण/वृक्षसंवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे
या कार्याला गती मिळावी या साठी उद्योजक श्री.सागर अशोक काळभोर यांच्या वतीने २० फुटी २५ पीव्हीसी पाईप ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांस भेट दिले.
वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धन हे कर्तव्यदक्ष नागरिक म्हुणुन आपली सर्वांची जबाबदारीच आहे पण त्या वृक्षांचे संवर्धन करणे सुद्धा आपलं दायित्व आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर पृथ्वी नष्ट व्हायला काही वेळ लागणार नाही म्हणजे सजीव सृष्टीचं संपेल हे सर्वांना माहिती असून सुद्धा आपण लक्ष देत नाहीत या गोष्टीसाठी जनजागृती करावी लागते तरी आपण तसं वागत नाही हि खरी शोकांतिका आहे.
आपल्याला जर आपली वसुंधरा अशीच हिरवा शालू परिधान करून सजीव सृष्टीचं संगोपन करणारी हवी असेल तर आपल्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन सागर काळभोर यांनी केले.
या वेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय शेंडगे, हवेली तालुका संपर्क प्रमुख श्री.बाबासाहेब यादव, जीवन जाधव, बाबासाहेब घोडके, नानासाहेब देशमुख, सिद्धार्थ खंडागळे,बिरूदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, निरक बिका, उपस्थित होते.
तसेच ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप यांनी श्री.सागर अशोक काळभोर यांचे ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने आभार मानले.
मुख्यसंपादक
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS