स्वर्गवासी नामदेव सोनवणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरनानिमित्त -आश्रमातील मुलांना वह्या पेन वाटप तसेच विविध उपक्रम - JDM

JDM


Breaking

Saturday, August 24, 2024

स्वर्गवासी नामदेव सोनवणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरनानिमित्त -आश्रमातील मुलांना वह्या पेन वाटप तसेच विविध उपक्रम



कोपरगाव प्रतिनिधी/

स्वर्गवासी नामदेव सोनवणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरनानिमित्त -आश्रमातील मुलांना वह्या पेन वाटप तसेच विविध उपक्रम


दिनांक 24 - 8- 2024 रोजी स्वर्गवासी नामदेव सोनवणे यांच्या द्वितीय पुण्यस्मारनानिमित्त मंजूर येथे राहत्या घरी नामदेव सोनवणे प्रतिष्ठान च्या वतीने तसेच एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे व प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजन तसेच कोपरगाव टाकळी येथील बहुसंख्य आदिवासी बहुजन समाजातील गरजू मुलांना वह्या पेन वाटप करण्यात आले. 

या प्रेरणादायी उपक्रमाने समाज,संघटनेमध्ये स्वर्गवासी नामदेव सोनवणे यांच्या कुटुंबाबाबत आपुलकीची भावना निर्माण झाली आहे व सर्वत्र या गोष्टीचे कौतुक देखील होत आहेत.

याप्रसंगी कोपरगाव टाकळी आश्रम शाळेचे महिला प्राध्यापिका कुलकर्णी म्हणाल्या की समाजातील समाज बांधव अनेक उपक्रम घेत असतात यामध्ये पुण्यस्मरण, लग्न समारंभ, वाढदिवस अशा उपक्रमामधे समाज बांधव हजारो लाख रुपये वाया घालत असता परंतु या सोनवणे कुटुंबाने आज जो पुढाकार घेऊन या एकलव्य आश्रमातील मुलांना वह्या पेन वाटप करून एक आदर्श उपक्रम राबवला आहे याबद्दल मी त्या कुटुंबीयाचे आभार व्यक्त करते.

त्याच प्रमाणे संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास पवार यांनी मुलांना संदेश दिला की शिक्षण घ्या.शिक्षण हे वाघिणीची दूध आहे आणि जो तो दूध पितो तो गुरगुर ल्याशिवाय राहत नाही तसेच शेवटी मार्गदर्शन करताना मंगेश औताडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले की तुम्ही देशाचे भवितव्य आहात नामदेव सोनवणे या आदिवासी युवकाची हत्या होऊन दोन वर्ष उलटून त्यांचे कुटुंब आज संघर्ष करत आहेत आणि या दोन वर्षात त्यांना भरपूर संघर्षाला तोंड द्यावे लागले, त्यांच्यावर टीका टिपणी झाल्या परंतु ते डगमगले नाही ते खंबीर पने उभे राहिले आणि आज ते कुटुंब एकदम मजबूत पणे उभे आहेत नामदेव सोनवणे यांचा मुलगा संकेत सोनवणे देखील संघर्षानंतर कोपरगाव येथे पंचायत समिती या ठिकाणी नोकरीवर कार्यरत आहे असा संघर्ष आपण देखील करावा व भविष्यात मोठ्या शासकीय नोकरीवर पदावर आपण कार्यरत व्हावे असा आशीर्वाद मार्गदर्शन मंगेश औताडे यांनी आश्रमातील मुलांना दिला.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे, 
राज्य संघटक विजय कंक, तालुका अध्यक्ष कैलास पवार, तालुका मार्गदर्शक राजू वाघ, सिन्नर तालुकाध्यक्ष सागर वाघ, कळवण युवा तालुकाध्यक्ष विजय माळी, तालुका उपाध्यक्ष पिंटू माळी, तालुका सहसंघटक लक्ष्मण बर्डे, संकेत सोनवणे, अनिकेत सोनवणे, अमोल गायकवाड, आदित्य धुमाळ आदीनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.



JD महाराष्ट्र NEWS 
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क: 9011302859