Badlapur Sexual Assault 'प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून महिला पोलिसाने.' जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टनं उडवली खळबळ - JDM

JDM


Breaking

Friday, August 23, 2024

Badlapur Sexual Assault 'प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून महिला पोलिसाने.' जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टनं उडवली खळबळ

Badlapur Sexual Assault 'प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून महिला पोलिसाने.' जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टनं उडवली खळबळ


बदलापुरतील शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट उसलळली आहे. शाळा व्यवस्थापन, पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविषयी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे. बदलापूरचं प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी एका महिला पोलिसाने शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक घेतल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आपल्या पोस्ट मध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘महिला पोलीसाने गुप्त बैठक घेतल्याचा आरोप… 

बदलापूरचं प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी एका महिला पोलिसाने शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. बदलापूरचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचं पीडित मुलीच्या पालकांनी म्हटलं आहे. आता ही महिला पोलीस अधिकारी कोण हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही’

या आरोपानंतर पोलीस प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाच्या कारभारावर आणखी प्रश्न उपस्थित झाले आहेत.