The Sun turned Blue: ब्रिटनमधील लोकांसाठी गुरुवारची सकाळ फारच आश्चर्यकारक ठरली.
गुरुवारची सकाळ झाली तेव्हा आकाशातील सूर्य त्यांना रोजपेक्षा फारच वेगळा दिसला.
ब्रिटनमधील लोकांना चक्क निळा सूर्य पाहायला मिळाला. त्यामुळेच सोशल मीडियावर ब्लू सनची चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसलं. अनेकांनी सोशल मीडियावर या निळ्या सूर्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. अनेकजण सूर्य असा का दिसतोय असं म्हणत चिंता व्यक्त केली. मात्र या ब्लू सनचं रहस्यनंतर उलगडलं आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला.