हिंदुत्वासाठी देश धोक्यात घालणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध.सीमा हैदरला आतंगवादी घोषित करून पाकिस्तानात पाठवा-डॉ. जितीन वंजारे - JDM

JDM


Breaking

Wednesday, July 12, 2023

हिंदुत्वासाठी देश धोक्यात घालणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध.सीमा हैदरला आतंगवादी घोषित करून पाकिस्तानात पाठवा-डॉ. जितीन वंजारे


बीड प्रतिनिधी - 
मागील आठवड्यामध्ये भारतीय मीडिया वरती मोठ्या प्रमाणावर सीमा हैदर आणि सचिन नामक महिला-पुरुषाची प्रेम कहाणी व्हायरल होत आहे. 
यामध्ये प्रेमिका सीमा हैदर ही पाकिस्तानातील मुस्लिम धर्मीय असून सचिन हा भारतीय हिंदू आहे सीमा हैदर ही मुस्लिम युवती पाकिस्तानात एकटी राहत असताना ती विवाहित असून तिला चार मुले आहेत.
तिचा पती गुलाम हैदर हा सौदी अरेबिया त राहतो असं असताना कोणत्याही प्रकारचा विजा किंवा भारतामध्ये येण्यासाठी च्या कागदपत्राची कोणत्याही प्रकारची परीपूर्तता न करता ही बाई कसल्याही प्रकारचा त्रास न होता भारतीय सीमा ओलांडून भारतामध्ये दिल्ली नोएडा इथपर्यंत राजरोषपणे येते....! 

 हे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न चिन्ह निर्माण करते. तिच्याकडे चार ते पाच प्रकारची विजा आधार कार्ड आहेत, चार पाच फोन आहेत ते पण तुटके फुटके,सिम कार्ड आहेत पाकिस्तानी सिम आहे. आणि इतर डॉक्युमेंट मिळाले असून भारतामध्ये प्रवेशासाठी लागणारा विजा मात्र तिच्याकडे नाहीये बेकायदेशीरपणे भारतामध्ये येऊन केवल हिंदू धर्म स्वीकारला म्हणून तिला भारताची सून म्हणून अवगत करणाऱ्या येथील सरकारचा जाहीर निषेध, येथील सुरक्षा यंत्रणा किती गाढ झोपलेल्या आहेत याचे हे ज्वलंत उदाहरण आहे,भारतीय सुरक्षा यंत्रणेला डोळ्यांमध्ये मुळव्याध झालेला आहे की काय? असा खणखणीत सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी विचारला आहे. 

ज्या देशात परकीय दुश्मन देशातील पक्षी पण येऊ शकत नाही त्यात चार पोरं घेऊन सुरक्षा यंत्रणेच्या नाकावर टीच्चुन एक बाई १२०० किमी चां प्रवास करून भारतात येते येथील मिडीयाला मुलाखत देते आणि नंतर येथील सुरक्षा यंत्रणेला माहिती होत हे देशाला घातक असून अतंकी हल्ले घडवून आणण्याच्या हालचाली मध्ये विषकन्नेचा प्रयोग होऊन येथील माहिती गुप्तपणे पाकिस्तानला देणाऱ्या अश्या लोकांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत नसता देश आगीत होरपळून निघेल. 

अतांगवादी हल्ले वाढतील निष्पाप निरागस लोकांचा जीव जाईल आणि तेंव्हा तुमचे डोळे उघडणार आहेत का असा सनसनीखेज सवाल मा.सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केला आहे.
            नुसत्या प्रेम कहानी वर न जाता एक पाचवी शिकलेली महिला फर्राटेदार हिंदी बोलते आहे त्याचबरोबर अतिशय चांगल्या प्रकारच्या काही इंग्लिश शब्दाचा वापर करत आहे,तिच्या मनात कसलीही भीती वाटत नाही याचा आर्थ तिला भारतातून कोणाचा तरी सपोर्ट असावा, पाकिस्तान मधून नेपाळला फ्लाईटने येत आहे, पाकिस्तानातील पैसा नेपाळमध्ये बदलून ती पुढील प्रवास अतिशय छानपने बिनधास्त न भिता करत आहे,तिच्याबरोबर पाकिस्तानातील काही आधार कार्ड आहेत, काही देशांचे विजा आहेत, काही तुटके फुटके मोबाईल आहेत.

पाकिस्तानातील सिम कार्ड आहे इत्यादी वस्तू तिच्यासोबत असणार हे सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने संशयास्पद असून सचिन नामक युवकाची ही फसवणूक ही असू शकते त्याचा बळीचा बकरा करून भारतामध्ये प्रवेश करून येथील गुप्त माहिती पाकिस्तानला देणारी ती एक गुप्तहेर असू शकते. कोणाच्या ना कोणाच्या मार्गदर्शनाशिवाय ती भारतापर्यंत पोहोचू शकत नाही असं असताना भारतीय यंत्रणा मात्र डोळ्यात मुळव्याध झाल्याप्रमाणे सर्रासपणे डोळे झाक करून येथील राजकीय व्यवस्था व मोदी सरकार केवळ मुस्लिम पाकिस्तानी महिला हिंदू धर्म स्वीकारते आणि भारताची हिंदू सून होते याच मुद्द्याकडे पाहून गप्प बसतात, येथील मीडिया एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे तिच्या मुलाखती नॅशनल टीव्ही वरती दाखवत आहे व या प्रेम कहाणीला दुजोरा देत आहे परंतु यामधून भारतीय सुरक्षा यंत्रणेची गुप्त माहिती दुश्मन देशाला दिली जाऊन यातून मोठमोठे बॉम्ब हल्ले,आतंकवादी हल्ले होऊन भारत मातेचे मोठे नुकसानही होऊ शकतं अशी पुसटशी कल्पना सुद्धा येथील सुरक्षा यंत्रणेला न येणे म्हणजे धर्मांधतेत अडकलेल्या सरकारसोबत येथील सुरक्षा यंत्रणा ही धर्म संकटात अडकलेली दिसते आहे.अश्याच प्रकारे एका वैज्ञानिकाला काही दिवसापूर्वी फसवल गेलं त्याच्याकडून पैसे व गुप्त माहिती लुटली गेली त्याच्यासोबत नुड सिन करून त्याला ब्लॅक मेल केलं गेलं. 

तसेच एका भारतीय सुरक्षा यंत्रणेतील अधिकारीही पाकिस्तानचा गुप्तहेर पकडला गेला तो आर एस एस चां पुरस्कर्ते होता अशी एक ना अनेक प्रकरणे होत असताना केवळ मुस्लिम पाकिस्तानी महिला हिंदू धर्म स्वीकारला म्हणून तिला माफ करन हे भारताला अतिशय महाग पडू शकत याची कल्पना येथील सुरक्षा यंत्रणेला आहे की नाही ? या प्रकरणावरून त्या बाईला स्पेशल चौकशी लाऊन क्वारंटाईन करून सखोल चौकशी केली पाहिजे कारण तिच्याकडे इतके आधार कार्ड कसे ? ती कोणा-कोणाच्या संपर्कात आहे ?तिने व्हॉट्स ॲप हिस्ट्री डिलीट केली आहे ती का केली असावी ? तिला कोणी स्पॉन्सर करत आहे?
तिचे सबंध कोणत्या अतंगवादी संघटनेशी आहेत का? तिचा भाऊ पाकिस्तानी फौज मध्ये आहे, तिला त्याकडून तर पाठवलं नाही ना? 
तिचा पहिला पती सौदी अरेबियात आहे तो पण या कटात सामील तर नाही ना ? 
सचिन नामक युवकाची आतंगवादी संघटनेशी काही सबंध नाही ना ? 
याचे डिटेल्स येथील सुरक्षा यंत्रणेने तपासून पाहिले पाहिजेत नसता येथील मीडिया फक्त पाकिस्तानी मुस्लिम लडकी बनी हिंदू , प्यार के लिये बदला धर्म और देश ! ह्याच बातम्या देऊन तिच्या मुलाखती घेण्यात व्यस्त आहे.तिच्यावर तू इथे आली कशी ? 
आणि तुझा काय उद्देश आहे ? हे परखड पणे विचारलं पाहिजे .कारण हा भारताच्या सुरक्षा यंत्रणेचा विषय आहे .तुमच्या आमच्या भविष्याचा प्रश्न आहे ,नाहीतर फक्त धर्मांध होऊन कुठवर आतंकी हल्ले सहन करायचे,देश जळताना ,फौजी मरताना कुठवर सहन करायचे आता मोदी आणि योगी गप्प का ? 
पुन्हा पुलवामा घडवायचे आहे काय ? 
तुम्हाला देश पेटवयाचा आहे काय? आता कुठ गेले NRC वाले.कुठ गेले CAA वाले आता पाकिस्तानी महिला इतक्या आरपार घुसली असताना तिला हे कायदे लागू करा म्हणणारे रस्त्यावर का येत नाहीत.

तिने हिंदू धर्म स्वीकारला म्हणून की काय ? 
हिंदू धर्म स्वीकारला फक्त एवढं बोलून चालणार नाही ती गुप्तहेर असू शकते? तिला सांगून शिकून पाठवलेलं असू शकते ? ती येथील सुरक्षा यंत्रणेचां इत्यंभूत रिपोर्ट पाकिस्तानात पाठवून मोठा धोका निर्माण करू शकते.हे येथील धर्मांध सरकार ने जाणून घेऊन तिला तात्काळ अटक करून तुरुंगात रवानगी करून कसून चौकशी लाऊन परत पाठवून द्या.याउलट विचार करून पहा प्रेमापोटी सचिन पाकिस्तानात गेला असता तर त्याच्यावर कोणत्या प्रकाराची कार्यवाही केली असती त्याला जिवंत सोडलं नसतं तेथील मीडियाने त्याला मारलेली बातमी पण दाखवली नसती कारण तेथील मीडिया देशहित पाहतो इथल्या सारखं मोदीच्या गुलामीत वागत नाही मग त्या देशाने जशी कार्यवाही केली असती तशी भारताने का केली नाही? 
तिला काय अधिकार आहे इथे राहण्याचा भारतात घुसण्याचा ?

तिच्यावर तात्काळ कार्यवाही करा असा सल्ला सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.