'तू खूप छान दिसतेस, माझ्याशी मैत्री कर', राहुरीच्या पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल - JDM

JDM


Breaking

Wednesday, July 19, 2023

'तू खूप छान दिसतेस, माझ्याशी मैत्री कर', राहुरीच्या पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल



अहमदनगर प्रतिनिधी 
रमेश खेमनर : 
एकीकडे 'सद्रक्षणाय, खलनिग्रणाय' हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असताना काही पोलीस कर्मचारी, अधिकारी वर्दीला काळिमा फासण्याचे काम करत असल्याचे नेहमीच उघडकीस येत आहे. त्याचबरोबर महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत असल्याचे समोर येत आहे. असाच काहीसा प्रकार अहमदनगर जिल्ह्यात समोर आला आहे. 
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा प्रकार घडला आहे. राहुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेवरच येथील पोलीस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. राहुरी पोलीस स्टेशनचे पीएसआय सज्जनकुमार नऱ्हेडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पीडित महिला जमीन खरेदीत फसवणूक झाल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आल्या असता, यानंतर अनेकदा संबंधित पीएसआयने व्हॉट्सअॅपवर धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 
               सदर पोलीस उपनिरीक्षक सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार देण्यासाठी देवळाली प्रवरा पोलीस ठाण्यात गेले होती. त्यावेळी एक अनोळखी इसमाने याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनच्या साहेबांना भेटण्यास सांगून, ते तुमचे काम करतील असे सांगितले. त्याचबरोबर संबंधित साहेबांचा नंबरही त्यांनी दिला. त्यानंतर संबंधित फोन नंबरवर कॉल केला असता दोन दिवसानंतर साहेब येणार असल्याचे सांगितले. 
त्यानुसार दोन दिवसांनंतर राहुल पोलीस स्टेशनला आले, तेव्हा समजले की ते रिटायर झाले आहेत म्हणून पोलीस उपनिरीक्षक नऱ्हेडा यांच्याकडे तक्रार सांगितली. 

व्हॉटसअॅपवर धमकीचे मेसेजेस
यावेळी पीएसआय नऱ्हेडा यांनी, तुम्हाला मिस्टर नाहीत का? तुम्ही एकट्याच आलेले आहेत का? तुमच्यासोबत कोणी नाही आले का? असे प्रश्न मला विचारण्यात आले. त्यानंतर म्हणाले की, तुमचे काम करुन दिल्यास माझा काय फायदा आहे, असे विचारले. तेव्हा त्यांना सांगितले की, तुम्हाला पन्नास हजार रुपये देईन. तेव्हा ते म्हणाले की, पैशाव्यतिरिक्त काय फायदा होईल. त्यावेळी त्यांना सांगितले की आणखी पैसे पाहिजे असेल तर देईन, तेव्हा 'ते मला म्हणाले की, मला काय पाहिजे' ते तुम्ही समजून घ्या, यानंतर त्यांना असे काहीही बोलू नका," सांगून तिथून काढता पाय घेतला.आठ दिवसांनंतर तक्रार अर्जासंदर्भात विचारणा करण्यासाठी कॉल केला असता, ऑफिसमध्ये येऊन चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा राहुरी पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी केली. 
मात्र यावेळी देखील पीएसआय नऱ्हेडा यांनी माझ्या नंबरवर मेसेजेस करण्यास सुरुवात केली. तू खूप छान दिसते, माझ्याशी मैत्री कर असे संदेश पाठवून जबरदस्ती केली. 

व्हॉट्सअॅपवर धमकीचे मेसेज पाठवून रुमवर नेत बळजबरीने अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. राहुरी तालुक्यातील महिलेच्या फिर्यादीवरुन संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.