शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
ताहाराबाद येथे समाजातील विशेष प्राविण्य मिळवणार्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.
ताहाराबाद वि.का.सोसायटीच्या कार्यालयात गावातील सोसायटी तर्फे ऊज्वल प्राविण्य मिळवलेले हरणबारी येथील श्री पंकज शिवाजी जाधव ME तसेच MPSC परिक्षेतुन पि.एस.आय पदी निवड झाली.
चि.चेतन किरण सनन्से नागापुर, कन्नड येथील विद्यार्थ्यांने NEET परिक्षेत 624 गुण मिळवुन MBBS साठी निवड झाली.
तसेच चि. धनंजय शामकांन्त रायते न्यावळोद ह.मु. मुंबई याने ईलेक्टीक डिप्लोमात 81.25% गुण घेऊन प्राविण्य मिळवले आहे.
ताहाराबाद येथील पोलीस भरतीत रोशन पगारे याचा आज योगायोगाने हे विद्यार्थी ताहाराबाद येथे असल्याने घाईघाईने छोटेखानी समाजाचा कार्यक्रम घेऊन समाजा तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी सोसायटी चेयरमन केदा अण्णा जाधव, व्हा. चेयरमन सौ.अंजना नंदन, काशिनाथ बापुजी, पोपट बापु घरटे, सोना अण्णा साळवे, ह.भ.प रामचंद्र नंदन महाराज, डॉ.डि.एस. महाजन, पुंडलिक आण्णा महाजन, सुनिल भाऊ जाधव, नाना आप्पा साळवे, सुरेश भाऊ महाजन, तुकाराम आण्णा महाजन, विठु आप्पा पगारे, संदिप कासारे, जिभाऊ नहिरे, गजानन साळवे तसेच जेष्ठ समाजबांधव मान्यवर ऊपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पि.एन साळवे सरांनी केले. यावेळी शाल श्रीफळ देऊन सर्वांना पेढे वाटुन आनंद साजरा करण्यात आला.
सत्कारार्थी सर्वांना सगरवंशीय लाँग नोटबुक भेट देण्यात आली.