भीषण अपघात पुण्यातील दाम्पत्य ठार - JDM

JDM


Breaking

Tuesday, June 13, 2023

भीषण अपघात पुण्यातील दाम्पत्य ठार

वर्धा: समृद्धी महामार्गावर कारला झालेल्या भीषण अपघातात पुणे शहरातील दांपत्य ठार झाले असून, चालक आणि दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. येळावेळी येथून समोर गेलेल्या समृद्धी महामार्गावर पुलगाव जवळ हा अपघात झाला आहे.
प्रियरंजनकुमार गोहित (वय ३७) आणि सोनी प्रियरंजन गोहीत (वय ३५) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये चालक पेंदुकर इंद्रकुमार बैद, सान्वी गोहीत (वय ८) आणि यीक्षीत गोहीत (वय ४ ) यांचा समावेश असून त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रियरंजनकुमार गोहित हे मुळचे मधुबिना जिल्हा बिहार येथील रहिवासी आहेत. मात्र, ते पुणे येथे नोकरीवर होते. नागपूर येथून ते कारने मुंबईकडे जात होते. मात्र, गाडी चालवत असतानाच चालक पेंदुकर बैद याला डुलकी लागली. यामुळे त्याचे वेगात असलेल्या कारच्या स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यात कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सावंगी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.