जिवती तालुका प्रतिनिधी
कृष्णा चव्हाण
जिवती -
जैव विविधता समिती ही गाव स्थळावर जैव विविधता चे संरक्षण करण्याचे काम करत असते म्हणून
अंबुजा सिमेंट फाऊंडेशन तर्फे पेरणीपूर्व मशागतीची तसेच पेरणीं नंतर मशागत करताना शेतकऱ्यांनी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे.अमाप कीटकनाशक, खत यांचे वापर केल्याने जैविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.मानवाने अमाप झाडांची कत्तल केली.दरवर्षी जेवढे झाडे तोडले जातात तेवढे लागवड केली जात नाहीत.म्हणून पावसाचे चक्र बदलले त्यामुळे उन्हाळ्यात तापमान वाढत जात आहे. तापमान वाढत जाऊन दरवर्षी मोठी मोठे वादळे येत आहेत.मान्सून वेळेवर येत नाहीत.मानवाने स्वत:च्या फायद्यासाठी निसर्गाचे नुकसान केले आहे.
आम्ही आज आमच्या सुखासाठी हे सर्व नाश करत आहोत मग आम्ही आमच्या नातवंड आणि येणाऱ्या पिढीसाठी किती मोठे संकट उभे करत आहोत.आणि याचे दुष्परिणाम आज मानव भोगत आहेत.म्हणून आपण जैवविविधता जतन केली पाहिजे याविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी अध्यक्ष स्थानी गट विकास अधिकारी डॉ. रेजीवाड सर,तर मुख्य मार्गदर्शक म्हणून अंबुजा सिमेंट फाऊंडेशन चे सहायक् प्रकल्प समन्वयक सुभाष बोबडे तालुका समन्वयक पानघाटे सर, बाबिलवार सर व उपरे सर प्रक्षेत्र अधिकारी तसेच तालुक्यातील ग्राम पंचायत मधील जैव विविधता समितीचे सदस्य उपस्थित होते.