Ashadhi Wari 2023: गजानन महाराजांची पालखी परळीत तर रुक्मिणी मातेची पालखी परभणी दाखल - JDM

JDM


Breaking

Tuesday, June 13, 2023

Ashadhi Wari 2023: गजानन महाराजांची पालखी परळीत तर रुक्मिणी मातेची पालखी परभणी दाखल

आषाढी वारीसाठी निघालेल्या राज्यभरातील पालख्या पंढरपूरकडे टप्याटप्याने कूच करत आहेत.
गजानन महाराज पालखी परळीच्या थर्मल कॉलनीतील श्रीराम मंदिर आणि न्यू हायस्कूल शाळेत सोमवारी मुक्कामी होती. तर ही पालखी आज दिवसभर परळी शहरात असून, आजचा मुक्काम जगमित्र मंदिरात असणार आहे. गण गण गणात बोते, विठ्ठल नामाचा व माऊलीचा जयघोष करीत पालखीचे आगमन झाले. रखरखत्या उन्हात वारकरी भगव्या पताका, गळ्यात टाळ, पखवाजाच्या तालात पालखी परळीत दाखल झाली आहे. 

वारकऱ्यांचा 750 किलोमीटरचा प्रवास दरम्यान श्री संत गजानन महाराज पालखी बीडच्या (Beed) परळी शहरात तर रुक्मिणी मातेची पालखी परभणी (Parbhani) जिल्ह्यात पोहचल्या आहेत. श्री संत गजानन महाराज पालखीचे परळीत सोमवारी दुपारी आगमन झाले असून, आज मुक्काम असणार आहे. यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. दरम्यान परळी येथील थर्मल कॉलनीतील भाविकांनी वारकऱ्यांचे जोरदार स्वागत केले. तर दुसरीकडे रुक्मिणी मातेची पालखी परभणीत पोहचली आहे. यावेळी परभणीकरांनी पालखीतील वारकऱ्यांचे स्वागत केले. 

गजानन महाराज पालखीसोबत सातशे वारकरी, तीन अश्व, नऊ गाड्या व रुग्णवाहिका आहे. पालखी 27 जूनला पंढरपूरला पोहोचणार असून, दिंडी नऊ जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत आहे. शेगाव ते पंढरपूर पायी वारी 33 दिवसांची असून, वारकऱ्यांचा 750 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. श्री गजानन पालखीचे परळीच्या सीमेवर अ. भा. वारकरी मंडळाच्या वतीने हभप रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तर पालखीतील विणेकरी मृदंगवादक, गायक, टाळकरी, वारकरी महाराज मंडळींचेही स्वागत करण्यात आले. परळी शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी पुढे निघाली. तर यावेळी पालखीचे स्वागत करण्यासाठी परळीकर सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. तर नागरिक, व्यापारीवर्गाच्या वतीनेही या पालखीचे आदरातिथ्य करण्यात येत आहे.