suraj pawar : 'पोलिसांसमोर सगळं सिद्ध झालंय' अखेर फसवणूक प्रकरणी सैराट फेम सुरज पवारनं मौन सोडलं - JDM

JDM


Breaking

Monday, October 3, 2022

suraj pawar : 'पोलिसांसमोर सगळं सिद्ध झालंय' अखेर फसवणूक प्रकरणी सैराट फेम सुरज पवारनं मौन सोडलं

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला प्रिन्स म्हणजेच अभिनेता सूरज पवार मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे.
मंत्रालयात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सूरज पावरचं नाव घेतल्यानं राहुरी पोलिसांनी 6 तास सूरजची चौकशी केली होती. मात्र या प्रकरणी आता स्वत: सूरजनं मौन सोडलं असून खरी माहिती समोर आणली आहे. सूरजनं फेसबुकवर सविस्तर पोस्ट शेअर करत मागच्या 15 दिवसांपासून त्याची मानहानी झाल्याचा आरोप केला आहे.

प्रिंट आणि डिजीटल मिडीयाने, कुठलीही शहानिशा करता माझ्या नावाने महाराष्ट्रभर रान पेटवलं असाही आरोप त्यानं केला आहे. माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत. आरोपींनी बचाव हेतून माझं नाव घेतल्यानं सिद्ध झाल्याचा खुलासा सूरजनं केला आहे. सूरजनं म्हटलंय, 'गेली दहा पंधरा दिवसात माझी एवढी मानहानी झाली.

किंवा केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सगळ्याच‌ मिडीयांनी माझे एवढे धिंडवडे काढले. तरी पण मी शांत होतो. अखेर मी स्वत: राहूरी पोलीस स्टेशनला हजर झालो.

पोलीसांसमोर सर्व कागदपत्रासह माझे म्हणने नमूद केले. त्यानंतर वेळोवेळी राहूरी पोलीस सांगेल त्या दिवशी हजर राहात होतो. पोलीस स्टेशनला पहील्यांदा हजर राहीलो आणि बाहेर मिडीयात 'प्रिन्सला पोलीसांनी केली अटक ! प्रिन्स खाणार जेलची हवा !

प्रिन्स अखेर जेरबंद ! या अशा मधळ्याच्या बातम्या देवून प्रिंट आणि डिजीटल मिडीयाने, कुठलीही शहानिशा करता माझ्या नावाने महाराष्ट्रभर रान पेटवलं'. हेही सैराट फेम प्रिन्सची 6 तास पोलीस चौकशी; लवकरच होणार अटक?
सूरजनं पुढे म्हटलंय, 'राहूरी पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत आणि त्यानंतर दाखल झालेल्या असंख्य तक्रारीत तक्रारदारांनी मला फक्त चित्रपटात काम करताना पाहीलं होतं. परंतू प्रत्येक्षात ते मला कधीच भेटले नव्हते.
राहूरी पोलीस‌ स्टेशनच्या अधिका-यानी अखेर सर्व तक्रारदारांना पोलीस स्टेशनला बोलवून त्याची खात्री करून घेतली. तर एकाही तक्रारदारची माझ्या बाबत तक्रार नव्हती. आरोपींनी बचाव हेतून ठेवून माझे नाव घेतले होते हे पोलीसांसमोर सिध्द झालं. पोलीस अधिकारी श्री.

दराडे साो आणि श्री. सज्जनकूमार न-र्हेडा आणि पोलीस टिमने सर्व सत्यता पडताळली आणि अखेर माझ्यावर लागलेलं "किटाळ" एकदाचं संपलं'. या काळात माझ्या जवळच्या लोकांचा माझ्यावरील विश्वास उडाला. जवळचटी माणसं आणि नाती माझ्यापासून दूर गेली, असं म्हणत सूरजनं दुख: व्यक्त केलं आहे.

त्याचप्रमाणे सूरजचं पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालं. सूरजनं म्हटलं, 'पाच महिन्यापूर्वी माझे लग्न झाले अशा आलेल्या बालंटा नंतर माझ्या पत्नी व तिच्या घरच्यांची परिस्थिती न सांगीतलेली बरी. या प्रकरणा नंतर सुखाच्या काळात माझ्या सोबत मज्जा मस्ती करणारे एकही मित्र या पडत्या काळात मदतीला धावली नाही. पण काही जवळचे चार लोकांनी मला धिर देवून या संकटात मदत केली त्यांचा शत:शहा ॠणी आहे..!'.